मदन उन्नई धरणाच्या भिंतीवर उगविली मोठमोठी झाड
धरणाच्या भिंतीवर वाढलल्या या झाडाझुडपामुळे भविष्यातील पावसाळ्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. धरणाच्या भिंतीवर कोणत्याही प्रकारचे झाडे झुडपे वाढू नये असा नियम आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही धरणाचे भिती वर झाडें झुडपे वाढल्याचे दिसुन येत नाही. झाडे झुडपे वाढल्यामुळे पावसाळ्यात झाडाच्या मुळाशी पाणी शिरून धरण फुटण्याची शक्यता मोठया प्रमाणात असते. महाराष्ट्रात खेकड्यानी सुरुंग केल्यामुळे व धरणाच्या भिंतीवर झाडे झुडपे वाढल्याने पावसाळ्यात धरण फुटल्याचे प्रकार घडल्याने असंख्य लोकांना यात आपला जीव गमवावा लागला आहे मालमत्तेचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन गावेची गावे यात वाहून गेलेली आहे, भविष्यात अशा प्रकारची घटना घडण्याचीशक्यता नाकारता येत नाही. तरी जिल्हा अधिकारी व अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापनसमिती यानी या कडे लक्ष देण्याची नितांतगरज आहे.