क्रिडा संकुल येथे लवकरच सिंथेटिक ट्रॅकची निर्मिती करणार- पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

प्रतिनिधी/दै-जन-संग्राम वर्धा : क्रिडा क्षेत्राचा व खेळाडूचा सर्वार्गित विकास करण्याचे केंद्र व राज्य शासनाचे धोरण आहे. यासाठी जिल्ह्यातील खेळाडूंना देशपातळीवर खेळाचे नाव लौकिक करण्यासाठी तालका स्तरावर स्टेडिअम तयार करण्यात यणार असन सेलू व आयटीआय टकडी येथे लवकरच स्टेडीअम तयार करण्यात येणार आहे सोबतच जिल्हा क्रिडा संकुल येथे नवीन सिंथटिक टक तयार करण्यासाठी निधी मंजूर करण्यात येणार असल्याचे मनोगत राज्याचे गृह निर्माण, गृह (ग्रामीण), शालये शिक्षण, सहकार व खनीकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी क्रिडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडूंच्या सत्कार कार्यक्रमात केले. जिल्हा क्रिडा संकुल येथे जिल्हा व्हॉलीबॉल प्रशिक्षण केंद्र व साई स्फोर्टीग क्लबच्यावतीने क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडूच सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाला माजी खासदार रामदास तडस, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, जेष्ठ व्हॉलीबॉल मार्गदर्शक श्रीराम गव्हाणे, राज्य क्रिडा मार्गदर्शक तथा माजी जिल्हा क्रिडा अधिकारी प्रशांत दोंदल, तालुका क्रिडा अधिकारी संदीप खोब्रागडे, क्रिडा मार्गदर्शक सुनील साकळे, सेवानिवृत्त प्रा. मदन इगळे, व्हॉलीबॉलचे राष्ट्रीय स्पर्धा पंच नितीन घोडे आदी उपस्थित होते. जिल्ह्यतील खेळाडू वेगवेगळ्या क्षेत्रात काम करुन आजही खेळाला प्राधान्य देऊन क्रिडा क्षेत्रात नवीन पिढी घडविण्याचे काम करीत असून या नवीन युवा पिढीनी देशपातळीवर क्रिडा क्षेत्रात नाव लौकिक करावे यासाठी राज्य शासनाच्यावतीने जिल्हयाच्या क्रिडा क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल असे आश्वासनयावेळी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले.

जिल्ह्यातील चांगलेखेळाडू निर्माण झाले पाहिजेयासाठी अत्याधुनिक स्टेडीयचीआवश्यता आहे यासाठीशासनस्तरावर प्रयत्न करणारअसून जिल्ह्यात क्रिडा अकादमीनिर्माण झाल्यास नवीन खेळाडूंनादेशापातळीवर खेळाचे नेतृत्वकरण्याची संधी प्राप्त होईलअसे माजी खासदार रामदासतडस म्हणाले. यावेळी व्हॉलीबॉल क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या तसेच जेष्ठ व्हॉलीबॉल खेळाडू, क्रिडा संकुल व्यवस्थापकाचा मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यातआला. व्हॉलीबॉल संघटनेचे पदाधिकारी , खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *