बचत गट भवनाच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ इतरांना मिळवून द्या- पालकमंत्री डॉ. पंकज भोयर
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : महिला बचत गटाची मोठी चळवळ जिल्ह्यात उभी आहे. गटांच्या बैठका, छोटे छोटे कार्यक्रम घेण्यासाठी महिला बचत भवन असावं ही मागणी होती. आता आपल्या हक्काचं बचत गट भवन उभ राहिल आहे. या भवनाचा उपयोग गटाच्या विकासासाठी करण्यासोबतच महिलांना नवनवीन माहिती तसेच शासकीय योजनांची माहिती द्यावी व त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवूनद्यावा, असे आवाहन राज्याचे गृह (ग्रामीण), शालेय शिक्षण, सहकार,गृहनिर्माण, खनिकर्म विभागाचेराज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केले. सावंगी येथे आमदार डॉ. पंकजभोयर यांच्या निधीतून महिलाबचत गट भवन उभारण्यात आले असून या इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, माजी जिल्हा परिषदउपाध्यक्ष वैशाली येरावार, उमेदचे अभियान व्यवस्थापक नीरज नखाते,माझी सरपंच मीनाक्षी जिंदे, सरितादोड यांच्यासह बचत गटातीलमहिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. पालकमंत्री डॉ. पंकज भोयर पुढे म्हणाले की, महिला बचत गटामध्ये केवळ सदस्य म्हणूनसहभागी न होता नवीन नवीनशिकण्याची उमेद निर्माण करा.बचत गटातून महिला उद्योजिका तयार झाल्या पाहिजेत, यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचेआह. यणाऱ्या काळात बचतगटातील महिलांचे विविध प्रश्नमार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी बचत गटातीलमहिलांनी आपले विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभा सहारयांनी केले. तर उपस्थितांचे आभारआरती सूर्यवंशी यांनी मानले.