नपची सिव्हील लाइनमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम

वर्धा/प्रतिनिधी रस्त्यावर वाढत्या अतिक्रमणामुळे रहदारीचा प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांनी मोकळा श्वास घ्यावा याकरिता नगरपालिकेच्या वतीने आज शुक्रवार ७ रोजी आंबेडकर पुतळा ते गांधी पुतळा आणि गांधी पुतळा ते सिव्हील लाइन मार्गावर अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. मोहिमेदरम्यान, ३२ जणांवर कारवाई करीत हातगाड्या ठेले व किरकोळ विकत्याच साहित्य जप्त कल. ही माहीम पुढील आदेशापर्यंत दररोज सुरू राहणार असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे याच भागातच नपच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जात आहे जणू शहरात अतिक्रमणच नाही. शहरातील प्रत्येक रस्त्यावर अतिक्रमण वाढले आहे. रस्त्यावर फळे, भाजीपाला, चहाट परी, खाद्य पदार्थ आदींची दुकाने थाटली आहेत. तर काही मोठ्या व्यावसायिकांचे अतिक्रमण रस्त्यापर्यंत आले आहे.

रस्त्याच्या दुतर्फा दुकाने थाटल्याने आवागमन करताना नाहक त्रास सहन करावा लागतो. हाच प्रकार आंबेडकर पुतळा ते गांधी पुतळा आणि गांधी पुतळा ते सिव्हील लाइन मार्गावर आहे. विशेष म्हणजे या रस्त्यावर महत्त्वाची शासकीय कार्यालये असल्याने नागरिकांची दिवसभर वर्दळ असते. हाच रस्ता पुढे सेवाग्रामकडे जातो. वाढत्या अतिक्रमणामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. आज राबवण्यात आलेल्या मोहिमेत जेसीबी आणि ट्रक्टरचा वापर करण्यात आला. रस्त्यावर आलेले दुकानाचे शेड, हातगाड्या, ठेले, फळ आणि भाजीपाला विक्रेत्यांचे सहित्य जप्त करीत ३२ जणांवर कारवाई करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *