महिलांच्या सुरक्षिततेसाठी शासन कुठेही कमी पडणार नाही- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
मुंबई/प्रतिनिधी महिलांच्या सुरक्षेसाठी शासन कडक कायदे करत आहे. कायद्याच्या अंमलबजावणी बरोबरच समाजात महिलांप्रति असलेली मानसिकता देखील बदलणे गरजेचे आहे. महिलांच्या तक्रारींचे तातडीने निरसन करण्यात येत आहे. समाज माध्यमांवर मॉर्फिंग आणि डीपफेक व्हिडिओंच्या माध्यमातून होणारे गैरप्रकार थांबविण्यासाठी सायबर तंत्रज्ञानाच्या मदतीने अशा गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य शासन ठोस उपाययोजना करीत आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी शासन कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महिला दिनानिमित्त महिला पत्रकारांसोबत साधलेल्या संवादादरम्यान दिली.
जागतिक महिला दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला पत्रकारांना शुभेच्छा देऊन सह्याद्री अतिथीगृह येथे संवाद साधताना महिलाच्या सशक्तीकरणासदभात महत्त्वाच मद्द माडल. महिलाना विविध क्षत्रामध्ये भेडसावणाऱ्या अडचणी, त्यांच्या सुरक्षेचे मुद्दे आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठीच्या सरकारी उपक्रमांवर त्यांनी प्रकाश टाकला. समाजातील मानसिकता बदलण्यासाठी आणि स्त्री-पुरुष समानताप्रस्थापित करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहनही मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले. राज्यमंत्री पंकज भोयर सुद्धा यावेळीउपस्थित होते.