ग्रामीण भागातील दर्जेदार रस्ते व शाळांच्या विकासासाठी न्यु डेव्हलपमेंट बँक करणार सहकार्य
या धोरणानुसार प्रत्येक विद्यार्थ्याचा कौशल्य विकास करण्यात येत आहे. कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम उपलब्ध करून दिल्यामुळे विद्यार्थी उन्नत होऊन राज्याला वेगाने विकसित करण्यासाठी हातभार लावल. शाळांचा विकास झाल्यानंतर तिथपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याला पोहोचण्यासाठी दर्जेदार रस्त्यांचीही गरज आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील रस्ते दळणवळण गतिमान करण्यासाठी सिमेंट काँक्रीटचे बनविण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून ‘सीएम श्री इन्स्टिट्यूशन’ हा शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र अमृतकाळ रस्ते विकास योजना, ग्रामविकास विभाग राज्यातग्रामीण भागात सिमेंट काँक्रीट रस्तेविकास प्रकल्प राबविणार आहे.
या प्रकल्पांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. बँकेच्या शिष्टमंडळात बँकेचे भारतीय प्रदेश कार्यालयाचेमहासंचालक डॉ. पांडियन यांच्या समवेत पब्लिक सेक्टर विभागाचे महासंचालक युरी सुरकोव्ह,सीनियर प्रोफेशनल बिंदू माधवपांडा, प्रिन्सिपल प्रोफेशनल बिन्तेकुमार, ‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी, वित्तविभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी गुप्ता, सार्वजनिक बांधकामविभागाच्या अपर मुख्य सचिवमनीषा म्हैसकर, मुख्यमंत्री यांच्याप्रधान सचिव अश्विनी भिडे, शालेयशिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंग देओल, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आदी उपस्थित होते.