गुणवत्ता व कौशल्ये विकसित करण्यावर भर द्या- पालकमंत्री डॉ. पंकज भोयर
कार्यक्रमाला जिल्हाधिकारी वान्मथी सी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सुनील हजारे, जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारीश्री. गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारीज्ञानदा फणसे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगारव उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त निता औघड, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य संजय कोकुलवारआदी मंचावर उपस्थित होते. युवकांनी आपले स्वत:चे आयुष्य घडविण्यासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घेणे महत्वाचे आहे. केंद्र व राज्य शासनाच्यावतीने युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून यासाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रक्षिक्षणाचा युवकांनी लाभ घेऊन स्वत:मध्ये कौशल्य विकसित करावे.
येणा-या काळात शासनाच्यावतीने मोठ्या उद्योग समुहाशी समन्वय साधन जिल्ह्यातील युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात येईल असेही पुढे बोलतांना पालकमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले. उद्योग व व्यवसाय सुरु करण्यासाठी युवकांध्ये व्यवसायासंबधी माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी शासनाच्यावतीने सामान्य रुग्णालया मागे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय परिसरात इन्क्युबेशन सेंटर सुरु करण्यात आल आहे. या इन्क्युबेशन सेंटर मध्ये व्यवसायसंबंधी प्रशिक्षण देण्यात येत असून या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असेही आवाहन डॉ. पंकज भोयर यांनी केले.
पुर्वी काळात रोजगाराच्या संधी रोजगार विभागामार्फत उपलब्ध करुन दिल्या जातहोत्या. सध्याच्या काळात या संधी माध्यमाव्दारे तसच साशल मिडिया व्दार उपलब्ध हात असन यासोबतच रोजगाराची संधी उपलब्ध करुन घेण्यासाठी मुलाखत कशा प्रकारे घेण्यात येतात याबाबत सविधा प्रशासन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी सांगितले. शासनाच्यावतीने युवकांना स्वयंरोजगारासाठी विविध प्रशिक्षण योजना राबविण्यात येत असून या योजनांचा युवकांनी लाभ घेऊन स्वयंरोजगाराची कास धरावी असे जिल्हाधिकारी वान्मथी सी म्हणाल्या. प्रास्ताविक करताना निता आघड म्हणाल्या जिल्हा काशल्य विकास रोजगार व उद्याजकता विभागाच्यावतीने रोजगार स्वयरोजगार प्रशिक्षण योजना, मुख्य युवा कार्य प्रशिक्षण योजना, प्रमादे महाजन प्रशिक्षण योजना, किमान कौशल्य योजना, स्टार्टअप प्रशिक्षण, पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यासारख्या कार्यक्रमाचे आयोजन करुन युवकांना प्रक्षिणासोबतच रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येत असून या संधीचा युवकांनी लाभ घ्यावा असे सांगितले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील उद्योजकांचे प्रतिनिधी, युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्याच्या दुस-या सत्रात उद्योजकांच्या प्रतिनिधीमार्फत त्यांच्याकडे रिक्त असलेल्या पदाकरीता मुलाखती घेण्यात आल्या. मुलाखतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तपत्र देण्यात आले.