विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी डिजिटल लर्निंग प्रकल्प उपयुक्त- पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

वर्धा/प्रतिनिधी केंद्र शासनाच्यावतीने नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यात आले असून येत्या सत्रापासुन या नवीन शैक्षणिक धारणाची अमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे या नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणीमध्ये डिजीटल लर्निंगमुळे ग्रामीण भागातील अद्यावतीकरणास चालना मिळेल, असे प्रतिपादन राज्याचे गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनीकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी स्मार्ट शाळा प्रकल्पाच्या शुभारंभ प्रसंगी केले.

संपर्क फाऊंडेशन, नायरा एनर्जी व जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यामाने आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात स्मार्ट शाळा प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला त्यावळी त बालत हात. कायकमाला जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी डॉ. मंगेश घोगरे, शिक्षणाधिकारी प्राथमिक नितू गावड, शिक्षणाधिकारी माध्यमिक मनिषा भंडग, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानदा फणसे, नायरा एनर्जीचे पब्लीक केअर अध्यक्ष दिपककुमार अरोरा, संपर्क फाऊंडेशनच्या उपाध्यक्ष अनुराधा गुप्ता आदी उपस्थित होते.

नवीन पिढी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवर असून विद्यार्थ्यांची वाचनाची व विचार करण्याची कमी झालेली क्षमता वाढविण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. सक्षम पिढी घडविणे, शाळा श्रेणी सुधारणा व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ करण्यास डिजिटल लर्निंग उपयुक्त ठरणार असल्याचे डॉ. पंकज भोयर म्हणाले. विज्ञान प्रदर्शनीमध्ये राज्यस्तरावर जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व व्हावे यासाठी जिल्ह्यातील विज्ञान प्रदर्शनी क्षेत्रात काम करणा-या विद्यार्थ्यांना विज्ञान संशोधन केंद्रास भेटी देण्यासाठी दौरा आयोजित करणार असून यामुळे येथील विद्यार्थी चांगल्या विज्ञान प्रतिकृतीच राज्यस्तरावर नेतृत्व करेल. शासनाच्यावतीने शाळेसोबतच विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास करण्यासाठी पीएमसी आदर्श शाळा, सीएमसी आदर्श शाळा, योजना सुरु करण्यात आल्या आहेत.

राज्य शासनाने आता शाळा क्रिडांगण योजना सुरु केली असून या योजनेचा शाळांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. यावेळी पालकमंत्री यांनी नायरा एनर्जीच्यावतीने जिल्ह्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पाचे कौतुक करुन यापुढे नायराच्यावतीने शाळांमध्ये डिजिटल वाचनालय प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. बाल वयातच विद्यार्थ्यांमध्ये डिजीटल शिक्षण दिल्यास विद्यार्थ्यांच्या बौघ्दिक क्षमतेत वाढ होऊ गुणवत्ता शिक्षण वाढेल.

नायरा एनर्जीच्यावतीने जिल्ह्यातील शाळा बाह्य विद्यार्थी,कुपोषण मुक्ती व टीबी मुक्त साठी प्रकल्पराबवून जिल्ह्याच्या विकासासाठीयोगदान देत असल्याबाबत नायराचे कौतुक यावेळी वान्मथी सी यांनी केले. स्मार्ट प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील ३५० शाळेचा समावेश करण्यात आलाअसून ५४० वर्ग, ३५० शिक्षक आणि१४ हजार विद्यार्थ्यांचा यात समावेश असणार आहे. यामध्ये पहिल्याटप्प्यात ४ तालुक्यातील ४३ शाळांचासमावेश करण्यात आला असून या समावेश असलेल्या शाळेच्या शिक्षक,शाळा समिती सदस्य व सरपंच यांना मान्यवरांचे हस्ते एलएडी टीव्ही वसंपर्क संचाचे वितरण करण्यात आले. नायराच दिपककमार अरारा यत्यांच्या कंपनीमार्फत राबविण्यातयेणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली. जिल्हा प्रशासनासाबत यापढही विविविकास प्रकल्पात भागीदारी करण्याचीग्वाही दिली.कार्यक्रमाला शिक्षक,शाळा समिती सदस्य, सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *