समाजात खरात प्रवृत्तीच निर्माण होऊ नये अशी सावध भूमिका समाजाने घेणे आवश्यक- खासदार अमर काळे

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : नुकत्याच नाशिक जिल्हयातीलउघड झालेल्या खरात लैंगीकअत्याचार, अंधश्रध्दा व बुवाबाजी प्रकरणाच्या निमित्याने यातीलसमाजात निर्माण झालेले बुवाबाजीचेसावट व संशय दूर करुन खरात प्रकरणातील वस्तस्थिती समाजासमोर यावी या उद्देशाने महाराष्ट्रअंधश्रध्दा निमर्ूलन समितीचे अध्यक्षप्रा. श्याम मानव यांचे “बुवा तेथे बाया’ या विषयावरील व्याख्यानाचे आयाजन दि. २७.४.२०२६ ला वर्धा येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन खासदार अमर काळे यांचे हस्ते करण्यात आले. आपल्या उदघाटनीय भाषणात खासदार अमर काळे यांनी समाजातील अंधश्रध्दा तसेच अंधश्रध्देला खतपाणी घालणाऱ्या रुढी व परंपरावर हल्ला चढविला.

आपल्या उदघाटनीय भाषणात त्यांनी पूर्वीचे काळी नवरा मेला की बाईची इच्छा असो वा नसो तीला नवऱ्याच्या धगधगत्या चितेवर बसवन सती जाण्यास हा समाज भाग पाडत होता. एखादया बाईने विरोध केला तर तीला समाज बहीष्कृत करुन वाटेल त्या पध्दतीने जीवन नकोसे करुन टाकत. शिक्षणात सुध्दा सावित्रीबाई फुले यांना महीलांना शिक्षण घेतांना जो त्रास झाला तो असहनीय होता. अक्षरश: लोक त्यांच्या अंगावर शेण व चिखल फेकत पण त्याही परिस्थितीत त्यांनी स्त्री शिक्षणाचा वसा अखंड कायम ठेवलाय त्याचीच परिणीती आज मुलींनी मुलांच्या बरोबरीने किंबहूना त्यापेक्षा जास्त प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी उत्तुंग भरारी मारली आहे.

याच पुरोगामी महाराष्ट्रातत्यांनी प्रेम महाराज नावाच्या एका भोंदू बाबांनी सहद लावून बेलाचे पान महादेवाचे पिंडीवर वाहल्याने मुले अभ्यास न करता पास होतात व यावर उपस्थित सर्व स्त्रियांनी एकासुरात टाळया वाजविल्या. यात महाराज खोटं बोलतो यापेक्षा स्त्रिया अंधश्रध्देच्या कशा आहारी जातात याचेच वाईट वाटले. शेवटी त्यांनी महाराष्ट्रात या धिरेंद्र शास्त्री नावाच्या भोंदू बाबाला संपूर्ण बंदी घालण्यात यावी अशीही मागणी केली. प्रारंभी खासदार अमर काळे यांचा शाल व श्रीफळ देऊन संस्थेचे अध्यक्ष प्रा. गजाननराव कोटेवार यांनी संस्थेच्या वतीने सत्कार केला. या कार्यक्रमाला चेतना सवाई, सुधीर पांगुळ, हरीष इथापे, पंकज वंजारी, अभ्युदय मेघे, मनोज चांदूरकर, संजय इंगळे, गजाननराव कोटेवार, निळसर इत्यादी मान्यवर मोठया संख्येने लोक हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *