मॉडेल हायस्कूल, वाढोणा येथील एन.एम.एम. एस. परीक्षेत तीन विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वाढोणा : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक (एन.एम.एम.एस) परीक्षेमध्ये मॉडेल हायस्कूल वाढोणा शाळेतून एकण १२ विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित होते. त्यापैकी वैष्णवी मांजरेकर, यश सोनटक्के, कार्तिक आबटकर, श्रावणी सहार, शख सोफियान, खुशी तांबेकर हे सहा विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले. यापैकी वैष्णवी मांजरेकर वर्धा जिल्ह्यातून तृतीय क्रमांकाने कार्तिक आबटकर नववा तर यश सोनटक्के अठराव्या क्रमांक पटकावून एन.एम.एम.एस. मध्ये शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले.
या योजनेत पात्र विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष बारा हजार रुपये शिष्यवृत्ती पुढील चार वर्षापर्यंत मिळणार आहे. मॉडेल हायस्कूल वाढोणाची एन.एम.एम.एस.परीक्षेत पात्र होण्याची परंपरा यावर्षी सुद्धा कायम ठेवली व नावलौकिक वाढवला. विद्यार्थ्यांना एन.एम.एम.एस. परीक्षेसाठी मोलाचे मार्गदर्शन श्री. दीपक वणवेसर यांनी केले. सर्व उत्तीर्ण व पात्र विद्यार्थी यांचे भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. शोभाताई काळे, सचिव श्री. संदीपभाऊ काळे व पदाधिकारी यांनी कौतुक केले व मुख्याधापक श्री. राऊत सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.









