“महाचतुर एआय चॅटबॉटमुळे’ कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता आणि मार्गदर्शन एकाच व्यासपीठावर मिळणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : राज्यातील युवकांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता आणि मार्गदर्शन एकाच व्यासपीठावर उपलब्धकरून देणारा “महाचतुर एआय चॅटबॉट’हा महाराष्ट्रासाठी परिवर्तनकारी उपक्रम आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या पुढाकारातून विकसित करण्यात आलेला हा चॅटबॉटदेशातील राज्य शासनाने तयार केलेला अशा प्रकारचा पहिलाच अभिनव उपक्रमआह. या चटबाटमळ यवा वगाचा शिक्षणते रोजगार हा प्रवास अधिक सुकर होईलआणि उद्योगांना कुशल मनुष्यबळ त्वरितउपलब्ध होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी केले. सह्याद्री अतिथीगृह येथे कौशल्य, राजगार, उद्याजकता व नाविन्यता विभागाच्या “चॅटबॅाट’ लोकार्पण वसामंजस्य करार पार पडले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. कौशल्य, रोजगार, उद्योजकता वनाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा, अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, राज्य नाविन्यता सोसायटीचे आयुक्तडॉ.अमित सैनी, व्यवसाय व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी, जपानचे वाणिज्यदूत हितोमि साटो, जर्मनीचे वाणिज्य दूत क्रिस्टोफ हेलिअर, कोरियाचे वाणिज्य दूत यो डाँवॉन, फिनलँडचे वाणिज्य दूत इरिक एफ हॉलस्ट्रॉम तसेच विविध उद्योग व शक्षणिक सस्थाच प्रतिनिधी, आतरराष्टीय भागीदार उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,भारताची ६५ टक्के लोकसंख्या ३५वर्षांखालील असून ही डेमोग्राफिकॲडव्हांटेज देशाच्या विकासासाठीमोठी संधी आहे. या युवा शक्तीलाकौशल्य प्रशिक्षण देऊन अर्थव्यवस्थेच्यामुख्य प्रवाहात आणणे आवश्यकअसून त्यासाठी केंद्र व राज्य शासनाने कौशल्य विकासाला प्राधान्य दिले आहे. महाराष्ट्रातही कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग प्रभावीपणे काम करत असून उद्योगांच्या गरजांनुसार प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यावर भर दिला जात आहे. उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ हवे आहे आणि तरुणांना रोजगार हवा आहे. या दोघांमध्ये प्रभावी दुवा निर्माण करण्याचे काम “महाचतर चटबाट’ करणार आह. एआय आधारित “चॅटबॉट’ कौशल्य प्रशिक्षण, रोजगार संधी, उद्योजकता मार्गदर्शन, अर्ज प्रक्रिया, असेसमेंट आणि मार्केट लिंकेज अशा सर्व सेवा वन-स्टॉप सोल्युशन म्हणून उपलब्ध करून देणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, विशेषतः रोजगाराभिमुख युवकांना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी हा चटबॉट उपयुक्त ठरणार असून व्हॉट्सपच्या माध्यमातून तो सर्वांसाठी सहज उपलब्ध असल्याने त्याचा माठ्या प्रमाणात लाभ हाइल, सटर आफ एक्सलन्स, आयटीआय आधुनिकीकरण, महिलांचा कौशल्य उपक्रमात सहभाग वाढविणे, तसेच विविध भागीदारींमुळे कौशल्य क्षेत्राला बळ मिळणार आहे. महाराष्ट्राची अथव्यवस्था जगातील तिसाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून आगामी काळात अधिक मोठी झेप घेण्यासाठी कौशल्य विकास विभागाची भमिका अत्यत महत्वाची आह. महाचतर हे नाव जितके सुंदर तितकाच हा उपक्रम दूरदृष्टीचा असून महाराष्ट्राला कौशल्य, रोजगार आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात नवी दिशा देणारा ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *