वाहनधारकांनो… अतिउष्णतेच्या वातावरणात बाहेर जाणे टाळा…!
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : अंगाची लाही करणारा उष्मा वाढतोच आहे. विदर्भातच नव्हे तर देशभरातील मोठी शहरे पण उन्हाने कापत असल्याचे चित्र आहे. सध्या तापमानाचा पारा ४५ अंशांच्या पुढे गेला आहे. मात्र असे असले तरी जगरहाटी काही थांबत नाही. या जाळून काढणाऱ्या उन्हात पण कामे टाळता येत नाही. घराबाहेर पडावेच लागते. अशा भीषण उष्णतेत दुचाकीवरून प्रवास करणे केवळ थकवणारे नसून ते आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते. उष्णतेच्या लाटेत प्रवास करताना “कशरीं डींीेज्ञश” किंवा उष्माघाताचा धोका सर्वाधिक असतो.
हा धोका टाळण्यासाठी आणि आपला प्रवास सुरक्षित करण्यासाठी काही उपाय अत्यंत प्रभावी ठरू शकतात. उष्णतेमध्ये शरीराला केवळ पाण्याची नाही, तर इलेक्ट्रोलाईट्सची (क्षार) जास्त गरज असते. घामावाटे शरीरातील महत्त्वाचे क्षार बाहेर पडतात, ज्यामुळे थकवा आणि चक्कर येण्याचे प्रमाण वाढते. प्रवासाला निघण्यापूर्वी आणि प्रवासादरम्यान नुसते पाणी पिण्याऐवजी लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी किंवा ओआरएस (जठड) युक्त पाण्याचे सेवन करण्याचे डॉक्टर सुचवितात. यामुळे रक्तातील साखरेचे आणि क्षारांचे प्रमाण टिकून राहते आणि मेंदूला तरतरी मिळते. असा एक समज की उन्हात कमीत कमी कपडे घातल्याने थंडावा मिळेल, पण हे चुकीचे आहे. उन्हात त्वचा जितकी उघडी राहील, तितकी ती लवकर डिहायडट होते. प्रवासावेळी पूर्ण बाह्यांचे, फिकट रंगाचे आणि सैल सुती कपडे घालावेत.
गडद रंग उष्णता शोषून घेतात, तर फिकट रंग उष्णता परावर्तित करतात. हेल्मेट वापरणे अनिवार्य आहेच, पण हेल्मेटच्या आत एक ओला सुती रुमाल ठेवल्याने डोक्याचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते. दुचाकीस्वारांसाठी “इव्हॅपोरेटिव्ह कूलिंग’ हा एक उत्तम पर्याय आहे. प्रवासाला निघताना तुमचा स्कार्फ किंवा जॅकेट स्वच्छ पाण्याने ओले करा. गाडी चालवताना लागणाऱ्या हवेमुळे या ओल्या कपड्यांतील पाण्याचे बाष्पीभवन होते, ज्यामळ तमच्या शरीराला थडावा मिळता. ही पद्धत नैसर्गिक एअर कंडिशनिंगसारखे काम करते आणि शरीराचे अंतर्गत तापमान अचानक वाढू देत नाही. दुपारी १२ ते ४ या वेळेत सूर्य आग ओकत असतो.
या काळात रस्ते तापलेले असतात आणि गरम वाऱ्याचे झोत (लू) वाहत असतात. शक्यतो या वेळेत प्रवास करणे टाळावे. जर काम महत्त्वाचे असेल, तर दर अर्ध्या तासाला सावलीत थांबून १० मिनिटे विश्रांती घ्या. प्रवासाचा वेग मर्यादित ठेवा, कारण ४५ अंशांपेक्षा जास्त तापमान असताना वेगाने लागणारी हवा शरीराला थंड करण्याऐवजी अधिक गरम करते. उष्माघात होण्यापूर्वी शरीर काही संकेत देते. जर तुम्हाला अचानक खूप तहान लागणे, डोके दुखणे, उलट्या होणे किंवा डोळ्यासमोर अंधारी येणे असात्रास जाणवला, तर त्वरित गाडी थांबवा. सर्वात धोकादायक लक्षण म्हणजे घाम येणेअचानक बंद होणे; याचा अर्थ शरीरातीलपाणी संपले आहे. अशा वेळी त्वरित थंड पाणी प्यावे आणि डोक्यावर व मानेवर गारपाण्याचे हबके मारावेत. उष्णतेची लाट हीएक नैसर्गिक आपत्ती आहे.
योग्य खबरदारीघेतल्यास आपण उष्माघातापासून स्वतः चा बचाव करू शकतो. प्रवास करताना सोबत पाण्याची बाटली नेहमी ठेवा आणि नियमांचे पालन करून आपला प्रवाससुखकर करा. वैद्यकीय जागृती मंचचे डॉ. सचिन पावडे हे ऋरलशलेेज्ञ ङर्ळींश मधून सांगतातकी गत १० वर्षांपासून तापमान वाढ होत आहे. जमिनीतील पाणी कमी होत आहे. त्याचा विपरीत परिणाम दिसू लागला आहे.आता हगवण, उलट्या, ताप असे पेशंट दिसत आहे त्याचे कारण म्हणजे वाढते तापमान. म्हणून शक्यतो दुपारी बाहेर पडणेटाळा. महिलांनी स्वयंपाक हा सकाळी १०वाजताच आटोपला पाहिजे. उन्हात सर्व खबरदारी घेत बाहेर पडावे. प्रवास करतांनासोबत पाण्याची बाटली ठेवा. भरदुपारी लग्नात जेवण घेतांना गरम अन्नच खावे. अती थंड टाळावे. सूचना पाळा आणि मगच उन्हात प्रवास करा.









