वर्ध्यात ‘सहकार’ नाही… ‘सर्कस’ सुरू!
पलाश उमाटे/दै.जन-संग्राम वर्धा : गेल्या दीड वर्षांपासून जलसंपदा सहकारी पतसंस्थेच्या अनैतिक व काळ्या धंद्यांवर पुरावे असतांना चौकशी प्रलंबित करीत पडदा घालण्याचे काम जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे आणि तालुका निबंधक सुचिता गूघाने यांनी केले मात्र पिंट्याचा पापाचा घडा भरल्याचे बघत काळ्या धद्यातील साथ सोडत चौकशी अहवाल सादर करून काळे हात पांढरे केल्याचे दिसत आहे.
यातच नव्याने धावडेने स्वतः च्या बचावार्थ वर्धा जिल्हा कर्मचारी सहकारी पतसंस्थांचा संघ मर्यादित, वर्धा संस्था स्थापन करीत पतसंस्थांच्या आवश्यक सुधारणा करण्यासाठी सहकार परिषद घेतली, मात्र कायकमाआधीच धावडनी जास्त भरवून ठेवलेले असल्याने कार्यक्रमच अंगलट आला आणि कार्यक्रमाचे सहकार क्षेत्रातील प्रमुख वक्ते विवेक जुगादे यांनी केलेल्या भाषणानंतर धावडेंचे घोडे लागणार याची कल्पना सर्व सहकार क्षेत्रातील मंडळींना आल्याने प्रत्येकाने आपले हात झटकणे सुरू करताच नागोबा चांगलेच हादरल्याचे चित्र आहे. या सर्व बाबतीत अनधिकृत वचस्व ठवण, मनमर्जी पश्यांची उलाढाल करणे, अनैतिकरित्या भरती प्रक्रिया राबविणे, कुठलेच खर्च सभासदांसमोर न मांडता अंधाधुंद खर्च करण्यात पिंट्या माहीर असताना बघत इतर २५ संचालक नागोबाच्या पिल्लावळीप्रमाणे बोळ्याने दूध पीत होते का की ग्लासात काही वेगळेच होते???
बैठका होत होत्या की नशेत ठराव पास की ठरावातच नशा हा नवा प्रयोग सुरू होता? आणि सगळं माहिती असून सुद्धा २५ पिल्लावळ नागोबाच्या सावलीत फक्त मान हलवत डोलत होती का की हात पण रंगवत होती? या सारखे अनेक प्रश्न जलसंपदा पतसंस्थेच्या सभासद व ठेवीदारांना पडत आहे. त्यामुळे धावडेंच्या मनमानी कारभारामुळे संस्थेतील नफ्यावर आणि सभासदांच्या डिव्हीडेंट वर नागोबाने एकटा डल्ला मारला की संचालक पिल्लावलींचा हात आहे. जलसंपदा पतसंस्थेवर मारलेल्या डल्ल्याच्या उघडकीशी नंतर संचालक मंडळ बरखास्त होणार का??? की धावडे प्रमाणेच इतर संचालकांचे घोडे लागण्याआधी टांगा पलटी करीत घोडे फरार होणार हे बघणे लक्षणीय आहे.









