समुद्रपूर येथे गो सम्मान अभियान अंतर्गत निवेदन सादर
प्रमोद झिबड /दै.जन-संग्राम समुद्रपुर : तालुक्यात गो सम्मान अभियान अंतर्गत गौ संरक्षण व सवधनासाठी विविध मागण्याचे निवेदन तहसीलदारांमार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल व मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आले. या अभियानातर्गत गौहत्या पूर्णपणे बंद करण्यात यावी, गोमातेला राष्ट्रमाता, राष्ट्रदेवी, राष्ट्रीय पूज्य व राष्ट्रीय धरोहर असा दर्जा द्यावा, तसेच गोसेवेसाठी स्वतंत्र केंद्रीय कायदा करण्यात यावा, अशी प्रमख मागणी निवेदनातून करण्यात आली.
श्री संत हरिओम बाबा गौशाला आश्रमाच्या नेतृत्वात झेंडा चौक, समुद्रपूर येथून भजन दिंडी काढण्यात आली. गोमातेचे भजन गात ही दिंडी तहसील कार्यालयात पोहोचली. यावळी नायब तहसीलदार झिले सर यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हरी ओम बाबा गौशाला आश्रमाचे संचालक ट्रस्टी राजाभाऊ मॅडमवार, रमेशजी भोयर, पत्रकार शांतीलालजी गांधी, प्रदीपचंद कुलकर्णी, शेख मनवर, अब्दुल कदीर, महाराज, मनोहर पुसदेकर, बिरे गुरुजी, रामकृष्ण धोटे, पियुष अगवाल, तसेच गापाल कष्ण गौशाला पवनगाव (करूर) येथील ह.भ.प. गजानन सायंकार, हेमंत महाराज तेजने, मंगेश महाराजपाल, कुणाल महाराज वैद्य, दिगंबरमहाराज ठाकरे आदींसह शेकडोगोभक्त व भजनी मंडळ मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
या भजन दिंडीदरम्यान समुद्रपूरपोलिस ठाण्याचे ठाणेदार रविंद्ररेवतकर व पोलिस प्रशासनाने चोखबंदोबस्त ठेवला. या कार्यक्रमातून गोसंवर्धनाबाबत जनजागृती करण्याचासंदेश यामधून देण्यात आला.









