वर्धेची सून आरंभी देशमुख ठरली “हायरॉस विन’

 प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : येथील लक्ष्मीनगर परिसरातील रामराव आणि ज्योती देशमुख यांची स्नुषा आणि राहुल यांची पत्नी आरंभी देशमुख वर्धेची सून! आरंभी देशमुख यांनी बंगळुरू येथे पार पडलेल्या हायरॉस स्पर्धे त सहभाग नादवत “हायरास विंन’ हा किताब पटकावला. स्पर्धेसाठी आरंभी यांनी वर्षभर कठार परिश्रम घतल. शालेय जीवनात त्या ज्यूदो या खेळात राष्ट्रीय स्तरावर खेळल्या होत्या. मात्र, नोकरी, विवाह आणि मातृत्वाच्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांचा खेळ मागे पडला. सुमारे वर्षभरापूर्वी त्यांनी पुन्हा फिटनेसकडे वळत नियोजनबद्ध सराव सुरू केला आणि हायरॉस स्पर्धेची तयारी केली.

हायरॉस स्पर्धा दिल्ली, बंगळुरू आणि मुंबई येथे आयोजित केली जाते. इनडोअर पार पडणार्या या स्पर्धेत १६ टप्पे असतात. यामध्ये धावणे आणि विविध शारीरिक कसरती यांचा समावेश असतो. धावणे, कसरती, स्कीएर्ग १ किमी, स्लेड पुश, स्लेड पुल, बर्पी ब्रॉड जंप, रोइंग, फार्मर्स कॅरी, सॅण्डबॅग लंजेस, वॉल बॉल्समध्ये ४ किलो चेंडू १०० वेळा ९ फूट उंच फेकणे आदी टप्प्यांचा समावेश होता. आरंभी देशमुख यांनी स्पर्धा २ तास ४७ मिनिटांत पूर्ण केली. या स्पर्धेसाठी प्रचंड शारीरिकआणि मानसिक ताकद आवश्यकअसते. पती राहुल आयर्नमॅन स्पर्धे ची तयारी करत असून दोघेहीअनेकदा एकत्र सराव करतात.त्यांचा मुलगा अरांश (५) यालाहीलहानपणापासून या गोष्टींचीओळख होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *