समृद्धी महामार्गावर अपघात; एक ठार

 प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून २५ एप्रिल रोजी पुन्हा कार चालकाचा मृत्यू झाला. हा अपघात पुलगाव पालिस ठाण्याच्या हद्दीत इडियन पेटाल पपाजवळ घडला. राहल यादव असे मृतकाचे नाव आहे. गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील वापी छेरी येथील धनंजय पटेल (४५) हे कुटुंबासह बनारसहून वापीकडे जात होते. कार त्यांचा मित्र राहुल यादव (रा. उत्तर प्रदेश) हा चालवित होता. सकाळी ६ वाजताच्या सुमारास नागपूरहून मुंबईकडे जाणार्या मार्गावर इंडियन पेट्रोल पंपाजवळ एम. एच. ३४ बी. जी. ७९६९ क्रमांकाचा मालवाहू उभा होता.

अचानक हे वाहन दिसल्याने चालकाचा ताबा सुटला आणि जी. जे. १५ सी. एम. २८९८ क्रमांकाची कार मालवाहूवर आदळली. यात चालक राहुल यादव याचा जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच महामार्ग पोलिस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. कारमध्ये धनंजय पटेल यांच्यासह त्यांची पत्नी आणि दोन मुले होती. त्यांनाही किरकोळ दुखापत झाली असून जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राहुल यादव यांना पुलगाव ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी पुलगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *