सावधान…! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : उत्तर भारतात निर्माण झालेल्या उच्च दाबाच्या क्षेत्राचा विपरीत परिणाम म्हणून पुढील काही दिवस राज्यातील काही भागांना देण्यात आलेला उष्णतेचा इशारा कायम राहणार आहे. मंगळवारी अकोला येथे देशात सर्वाधिक तापमान म्हणून ४४ अंश सेल्सिअसची नोंद झाली असतानाच बुधवारी देखील विदर्भ आणि राज्यातील अनेक भागात कमाल तापमान चाळीस अंशांवर नोंदविण्यात येईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर मुंबई महानगर प्रदेशात देखील उष्णता अधिक राहील, असे देखील हवामान अभ्यासाकांकडून सांगण्यात आले.

ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात कमाल तापमान पढील एक आठवडा सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्टाच्या अतगत भागातील काही जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थितीची शक्यता आहे. विदर्भात (४२+), मराठवाडा, मध्य महाराष्ट्र (३८-४०), कोकण प्रदेशात उष्ण दमट (३४-३६) तापमान राहील. गल्या काही दिवसांपासून म्हणजे विशेषतः एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यात कमाल तापमान सरासरी होते. परंतु आता उष्णतेमध्ये वाढ झाल्याने तापमान अधिक वाढल्याने नागरिकांना मोठ्या कमाल तापमानाचा सामना करावा लागत आहे. हवामान अभ्यासाक अथ्रेय शेट्टी यांच्याकडील माहिती नुसार, मुंबई महानगर प्रदेशात शुक्रवारपर्यंत उष्णतेच्या लाटे सदृश्य स्थिती राहील. मुंबईचे कमाल तापमान ३५ आणि ३६ अंशांच्या आसपास नोंदविले जात असून हवामानातील बदलामुळे मुंबईकरांना अधिक अधिक ताप सहन करावा लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *