राष्ट्रपतींसाठी महामार्गासह अंतर्गत मार्गही बंद

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : राष्ट्रपती द्रौपदी मुमर्ू आज गुरूवार १६ एप्रिल रोजी वर्धेत येत आहेत. त्या सेवाग्राम येथील गांधी आश्रमाला भेट देणार आहेत. तसेचमहात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहे. याच दौर्यामुळे १६ रोजी महामार्गसह काही अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. गुरूवार १६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत सेवाग्राम व वर्धा शहरातील काही महत्त्वाचे मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. तर वाहतूक पर्यायी मार्गांवर वळविण्यात येणार आहे.

महिलाआश्रम ते सेवाग्राम मार्ग तसेच म्हसाळा बायपास हा मार्ग काही कालावधीसाठी पूर्णतः बंद राहील. दत्तपूरहून नागपूरकडे जाणारा रस्ता तसेच काही महामार्गांवरील वाहतूक बंद ठेवली जाईल. नागपूरकडे जाणार्या वाहनांसाठी समृद्धी महामार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आल आह. पालिस अधीक्षक सारभकुमार अगवाल यानी वाहतूक विभागाला आवश्यक सूचनाही दिल्या आहे. शहरातील प्रत्येक चौकात कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. उन्हाची तमा न बाळगता पोलिस अधिकारी व कर्मचारी खडा पहाराच देणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *