डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त महाप्रसादाचे भव्य आयोजन; पीएच.डी. प्राप्त डॉ. प्रेमकुमार नाईक यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मानस बहुउद्देशीय शैक्षणिक व सामाजिक संस्था, वर्धा यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा महाप्रसादाच भव्य आयाजन करण्यात आले. हा कार्यक्रम १४ एप्रिल २०२६ रोजी शासकीय क्रीडा विभागाजवळ अत्यंत उत्साहपण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सामाजिक ऐक्य, बंधुभाव व समतेचा संदेश देणारा हा सोहळा विशेष ठरला. कार्यक्रमास वर्धा जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये सन्माननीय खासदार श्री अमर दादा काळे, सन्माननीय ज्येष्ठ समाजसेवक श्री समीर दादा देशमुख, सन्माननीय ज्येष्ठ समाजसेवक श्री नितेश दादा कराळे, सन्माननीय नगराध्यक्ष वर्धा श्री सुधीर दादा पांगुळ, सन्माननीय ज्येष्ठ समाजसेवक श्री प्रवीण पेठे साहेब तसेच सन्माननीय ज्येष्ठ समाजसेवक श्री राजू धमाने साहेब यांचा समावेश होता.
कार्यक्रमादरम्यान डॉ. प्रेमकुमार दिलीपराव नाईक यांना पीएच. डी. पदवी प्राप्त झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. हा सत्कार सन्माननीय खासदार श्री अमर दादा काळे, सन्माननीय समाजसेवक श्री समीर दादा देशमुख,सन्माननीय समाजसेवक श्री राजू धमान साहेब, सन्माननीय ज्येष्ठ समाजसेवक श्री नितेश दादा कराळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी डॉ. प्रेमकुमार नाईक यांनी सर्व मान्यवर व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच या कार्यक्रमाला मानस संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले. एकूणच, या महाप्रसाद सोहळ्याद्वारे समाजामध्ये बंधुभाव, समता आणि सामाजिक ऐक्याचा प्रभावी संदेश पोहोचविण्यात आला.









