देवळीकरांच्या जीवाशी खेळ?

सागर वैद्य/दै.जन-संग्राम वर्धा : वर्धा जिल्ह्यातील देवळी शहरात असलेल्या नामांकित महालक्ष्मी स्टील प्लॅन्टमधून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या कथित वायू प्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. अलीकडे समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये कारखान्यातून बाहेर पडणारा दाट धूर आणि त्याचा आजूबाजूच्या परिसरावर हात असलेला परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या प्रदूषणाचा फटका थेट मानवी आरोग्याबरोबरच पर्यावरणालाही बसत आहे. प्राणवायू दणाऱ्या वृक्षाची पान काळवंडलेली दिसत असून, झाडांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. जर झाडांची ही अवस्था असेल, तर सामान्य जनतेच्या आरोग्याचे पुढे काय? असा सवाल दवळीकराकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, महालक्ष्मी स्टील प्लॅन्टकडून पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहेत. मात्र, इतके गंभीर चित्र असतानाही संबंधित प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने प्रशासन कारखान्याला पाठराखण करत आहे का?

असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काही नागरिकांनी तर प्रशासन आणि कारखाना व्यवस्थापन यांच्यात मांडवली असल्याचा संशय व्यक्त केला आहे. देवळी प्रशासनासोबत मांडवली करणारा “बादशाह’ नेमका कोण? असा थेट सवालही आता चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर, देवळीतील सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीने तपासणी करावी, तसेच दोषी आढळल्यास कारखान्यावर कठार कारवाइ करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा, महालक्ष्मी स्टील प्लॅन्ट देवळीकरांचे बळी घेणार का? असा भीषण प्रश्न भविष्यात उभा राहू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *