जनता विद्यालय देवळी येथे “स्नेहरंग २०२६’ स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

भूषण वानखेडे/दै.जन-संग्राम देवळी : लोक शिक्षण मंडळ, देवळी संचालित जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, देवळी येथे “स्नेहरंग २०२६’ हे भव्य वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. स्नेहरंग रंगात रंगूया, नाती जपूया या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमाचे आयोजन २४ जानेवारी २०२६ रोजी जनता हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, देवळी यथे करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. रवि प्रमोदबाबू शेंडे, अध्यक्ष लोक शिक्षण मंडळ, देवळी हे होते. तर मा. किरणभाऊ ठाकरे, नगराध्यक्ष नगर परिषद देवळी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. याशिवाय मा. अनुप अग्रवाल, मुख्याधिकारी नगर परिषद सेलू यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या स्नेहसंमेलनात बक्षीस वितरण, सन्मान सोहळा, विविध सांस्कृतिक कार्यक्रम यासह “विज्ञान २०२६ : नवकल्पनांची उड्डाणे’, कला-कौशल्य दालन आणि रंगविश्व हे विशेष आकर्षण ठरले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रात्साहन दणाऱ्या या उपकमाना उपस्थिताकडन उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाप्रसगी सामाजिक श्रेत्रात योगदान देणारे पत्रकार, समाजसेवक यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी जनसंग्राम न्यूज चॅनेलचे पत्रकार किशोर सुरकार यांचा सत्कार करण्यात आला. शैक्षणिक, सामाजिक व पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आल्याने कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली. या स्नेहसंमेलनाला विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून कार्यक्रम यशस्वी केला. कार्यक्रमाचे संचालन कु प्रिया जाधव, प्रतिक्षा शेंडे, मंगेश कुवारे, मनोज सातपुते, शिरीन शेख यांनी केले तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक श्री भाऊराव जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शाळा महाविद्यालयाचे सर्व शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकतर कमचारी यानी मागील आठ त दहा दिवसापाहून कठोर मेहनत घेऊन पडद्या मागील भूमिका चोखपणे पार पाडली. कार्यक्रमाला ओंकार विद्यानिकेतन, जनता प्रा शाळा, जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी, शिक्षक बंधू भगिनी, सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *