स्व. पंकजजी चोरे यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण व नवीन इमारतीचे उद्घाटन सोहळा राज्यमंत्री तथा पालकमंत्री वर्धा यांच्या हस्ते संपन्न

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम देवळी : स्थानिक सृजन कॉन्व्हेंट व ज्यू. कॉलज, दवळी यथ दिनाक १० जानेवरी २०२६ ला संस्थेचे माजी अध्यक्ष स्व. प्रा. पंकजजी चोरे यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण व नवीन इमारतीचे उदघाटन मा. पंकजजी भोयर, राज्यमंत्री तथा पालकमंत्री वर्धा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलतांना त्यांनी देवळी सारख्या परिसरात पंधरा-वीस वर्षांपूर्वी एखादा शिक्षक इंग्रजी मिडीयम शाळेचं स्वप्न पाहतो आणि ते पूर्ण करण्याचा ध्यास घेतो, त्यातूनच सृजन कॉन्व्हेंट सारखा एक वटवृक्ष उभा राहतो, हे खरोखरच प्रशासनीय आहे असे गौरवोद्गार वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी काढले.

या कार्यक्रमाला देवळी पुलगाव विधानसभेचे आमदार राजेश बकाणे, माजी खासदार रामदास तडस, देवळी नगरपरिषदेचे अध्यक्ष किरण ठाकरे, समाजसेवक मोहन बाबू अग्रवाल, नगरसेवक राहुल चोपडा उपस्थित होते. विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षक प्रा. पंकज चोरे यांच्या दुर्दैवी निधनानंतर त्यांच्या पत्नी डाक्टर श्रद्धा चोरे आणि संस्थेचे सचिव प्रशांत चव्हाण यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने सृजन शाळा पुढे नेली आणिआज परिसरातील सर्वात मोठीशाळा म्हणून येथे अस्तित्वात आलीअशी भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली.कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थेच्या अध्यक्षा डॉ. श्रद्धा चोरे, व सचिव डॉ. प्रशांत चव्हाण यांनी केले. संचालन मयूर तेलरांधे वआभार सुनीता वाडेकर यांनी केले. कायकमाला स्वर्गीय पकज चारे याचमाजी विद्यार्थी, गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि सृजन शाळेचे संपूर्णविद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *