नगराध्यक्षांची शहर स्वच्छतेतून कामाला सुरूवात
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : समार चार वषानंतर शहराला नगराध्यक्ष मिळाला आह. जनततन निवडन आलल नवनिवाचित नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांनी १ जानेवारीला पदभार स्वीकारताच शहर स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करून कामाला सुरुवात केली. त्यांनी शहरातील विविध प्रभागांना भेटी देत नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. नगर परिषदेमधील अटल बिहारी वाजपेयी सभागृहात नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांचा पदग्रहण समारंभ पार पडला. यावेळी मुख्याधिकारी विजय देशमुख यांनी त्याच पष्पगच्छ दऊन स्वागत कल.
यावेळी माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे, डॉ. अभ्युदय मेघे, उपमुख्याधिकारी अभिजीत मोटघरे आदींची उपस्थिती होती. नगर परिषदेत झालेल्या पदग्रहण समारंभासाठी नवनिर्वाचितनगरसेवकानाही आमंत्रित करण्यातआले होते. यावेळी नगरसेवकपवन राऊत, वंदना भुते, शुभांगी कोलते, सतीश मिसाळ, राखी पांडेआदींनी उपस्थित राहून नगराध्यक्षांचेस्वागत केले.









