होमगार्ड वर्धापण दिनाचा सप्ताह उत्साहात साजरा

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : होमगार्ड व नागरी संरक्षण दलाच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनात विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन सप्ताह साजरा करण्यात आला. होमगार्ड संघटनेचे काम अतुलनिय असून होमगार्डनी रक्तदान करुन रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी फार मोलाची कामगिरी केली आहे. कायदा व सव्यवस्था राखण्यासाठी १०० टक्के होमगार्डची पुर्तता होत असते.

भविष्यात अशाच प्रकारे कार्य करुन होमगार्ड संघटनेने आपले नाव आणखी उज्वल करावे, असे सदाशिव वाघमारे यानी सागितल. हामगाड सघटनची स्थापना ६ डिसेंबर १९४६ साली मुबंई शहरात झाली. जनतेतून जनतेच संरक्षण करण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी होमगार्ड संघटनेच्या जवानाकडून पोलिस यंत्रणेला भरभरुन मदत होत असते. मुबंई शहरात होमगार्ड संघटनेची स्थापना मोरारजी देसाई यांनी केली व आज या छोट्याशा रोपट्याच रुपांतर वटवृक्षामध्ये झाले. संघटना देशपातळीवर कार्य करती आहे. ही गौरवाची बात आहे, असे सदाशिव वाघमारे म्हणाले. सप्ताहादरम्यान ७० पुरुष हामगाड व ३५ महिला होमगाडचे प्रशिक्षण घेण्यात आले. तसेच पथसंलनाचे आयोजन करुन जिल्हा होमगार्ड समादेशक यांना सशस्त्र मानवंदना देण्यात आली.

यावेळी होमगार्ड संघटनेच्यावतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात २२ पुरुष व महिला होमगार्डनी रक्तदान केले. होमगार्डच्यावतीने लक्ष्मीनगर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यासाठी नगर सेवक विलास आगे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाप्रसंगी वरिष्ठ पलटन नायक बाबा तरक यानी राष्टपतीच्या संदेशाचे वाचन केले. तसेच सन २०२५ मध्ये सेवानिवृत्त झालेले मानसेवी अधिकारी मधुकर बागेश्वर, सुरेश कोपरकर, उमेश काबंळे, रेखा मानवटकर यांचा सत्कार करण्यात आला. हिंगणघाटपथकातील समादेशक अधिकारी कैलास रोकडे यांच्या नेतृत्वातयोग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. योग प्रशिक्षक वसंतरावपाल यांनी उत्तमप्रकारे होमगार्डना योग शिकवून सुदृढ आरोग्याबाबतमार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रदीपबलवीर यांनी केले.

कार्यक्रमयशस्वीतेसाठी केंद्रनायक प्रमोदवानखेडे, प्रशासकिय अधिकारीसंजय सुराशे, पलटन नायक प्रदीपबलवीर, अनंत गजबे, समादेशक अधिकारी हेमलता कांबळे, कैलासराकड, मनाहर ढवळ, फिराज खापठाण, चंद्रकांत पिंजरकर, वसंत नाईक, गजानन ससाने, नितीन शेंडे, चंद्रशेखर शेलकर, सारीका चामटकर, रंजना करपाते यांनीप्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *