वर्धेतील प्रधानमंत्री आवास योजनेत लाभार्थ्यांना मंजुरी पत्र
केंद्रीय गृह मंत्री, अमित शहा यांच्या शुभहस्त व मख्यमत्री देवन्द्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महा आवास अभियान २०२४-२५ अंतर्गत प्रधानमंत्री आवासयोजना ग्रामीण टप्पा-२ मधील लाभार्थ्यांनामंजूरी पत्र वितरण व लाभार्थ्यांना प्रथम हप्तावितरण बालेवाडी पुणे येथून झाले आहे. जिल्हा परिषद वर्धा येथील कार्यक्रमासकार्यकारी अभियंता बांधकाम शुभम गुंडतवार,कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा धिरज परांडे उपस्थित होते. यशस्वीतेकरिता चेतन ठाकरे, अतुल तुरणकर, राजेश घरतकर, नरेशपवार, सोनाली सोमनाथे, श्रीमती, अर्चना पाटील यानी सहकार्य केले. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणटप्पा १ मध्ये १६६१०, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ मध्ये ११७, रमाई आवास योजनेत ७४४१, शबरी आवास योजनेत ४४५५ घरकुले पूर्ण करण्यातआली आहेत. महाराष्ट्र शासनाच्या १०० दिवसाच्या कार्यक्रमामध्ये वर्धा जिल्ह्याला १९०४ घरकुले ३१ मार्चपर्यत पूर्ण करण्याचेउद्दिष्ट देण्यात आले आहे.