“घोड्याची लीद’ प्रकरणात पिपरी (मेघे) ग्रामपंचायत कारवाई करणार का?
वर्धा/प्रतिनिधी स्थानिक पिपरी मेघे येथील ग्रामपंचायत हद्दीतील शिवपार्वती मंगल कार्यालय लगतच्या अंगणवाडी परिसरात एका घोडा व्यवसायिकाद्वारे घोड्याचा तबेला बांधला असून त्या ठिकाणी घोड्याची विष्ठा (लिद ) सुद्धा टाकल्या जाते. त्यामुळेच अंगणवाडी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत घट झाली असून व विद्यार्थ्यांच्या पोषक आहारामध्ये या घोड्याच्या लिदमधील अळ्या व सूक्ष्मजंतू दिसून आले आहे. सदर लेआऊट मधील खुली जागा ग्रामपंचायतला हस्तांतर केल्यानंतर सुद्धा अशा प्रकारे खाजगी व्यवसाय सुरू करण ह कितपत याग्य असन यामध्ये ग्रामपंचायत व सदर व्यक्ती यांचे हितसंबंध तर जोपासले जात नाही ना? अशी शंका – कुशंका निर्माण झाली आहे.
याच परिसरात ग्रामपंचायत मार्फत शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील केली गेली आहे. परंतु अशा घाणेरड्या परिसरात चिमुकले कुठल्या पद्धतीने शिक्षण घेतात हे न बोललेलेच बरे. वारंवार तक्रारी करून सुद्धा ग्रामपंचायत पिपरी मेघे ग्रामपंचायत कारवाई का करीत नाही? हे न उलघडणारे कोडेच आहे. मानव वस्तीत पाळीव प्राणी (घोडा ) ठेवता येतो का? याबाबत वनविभागाची परवानगी घेतली गेली का? यावर सुद्धा चौकशी करणे गरजेचे आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प वर्धा यांनी या अंगणवाडीला भेट दिल्यास वास्तविकता लक्षात येईल. (क्रमश:)