जिल्ह्यात नप निवडणुकीत २८ जागांना स्थगिती; २० रोजी पुन्हा निवडणूक
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : जिल्ह्यातील ६ नगरपालिकांतील नगराध्यक्ष व नगरसेवकांकरिता २ डिसेंबरला मतदान होणार आहे. मात्र, आरक्षण आणि आक्षेपात जिल्ह्यातील २८ उमेदवार अडकले. त्यामुळे येथे २० डिसेंबर रोजी मतदान होऊन २१ रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी दिली. नामनिदशन अजाच्या छाननीच्या दिवशी हिंगणघाट येथे ३, पुलगावात २, देवळीत १ तर वर्धा पालिकेत २ आक्षेप नोंदविण्यात आले होते. ते त्या त्या ठिकाणी फेटाळण्यात आले. त्यामुळे जिल्हा सत्र न्यायालयात दाद मागण्यात आली. न्यायालयाकडून २२ नोव्हेंबरपर्यंत निर्णय देणे अपेक्षीत होते.
सर्व अपिल न्यायालयाने २४ रोजी खारीज केल्या असल्या तरी हाच प्रकार आता ४ नगरपालिकांतील २८ जागांची निवडणुका स्थगित करण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. विशेष म्हणजे रविवार ३० रोजी निवडणूक आयोगाची ४ वाजता व्हिडीओ कॉन्फरन्स संपली. या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये निवडणूक आयोगाच्या अधिकार्यांनी तातडीने लेखी निर्देश पाठविले जाईल, त्यानुसार कार्यवाही करा अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकार्यांना दिल्या आहे.
वर्धा : वर्धा नगरपालिकेत प्रभाग ९ “ब’ व प्रभाग १९ “ब’ मध्ये आक्षेप प्राप्त झाला होता. या दोन्ही आक्षेपांचा सोक्षमोक्ष निवडणूक निर्णय अधिकारी गणेश खताळे यांनी करून आदेश निर्गमित केला. त्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयात अपिल करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही अपिल खारीज केल्या. निवडणूक आयोगाने २९ रोजी नगरपरिषद क्षेत्रात २ डिसेंबर रोजी सार्वजनिक रात्रीला दिलेले निर्देश कायम ठेवत प्रभाग ९ “ब’ व प्रभाग १९ “ब’ या सदस्य पदाची निवडणूकच स्थगित झाली असल्याचे जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी तरुण भारतसोबत बोलताना सांगितले.
हिंगणघाट : हिंगणघाट नगरपालिकेत छाननीच्या दिवशी प्रभाग ५ “अ’ व “ब’ तर प्रभाग ९ मधील “अ’ मध्ये आक्षेप नोंदविण्यात आला होता. तिन्ही अपिल न्यायालयाने खारीज केल्या होत्या. मात्र, आता पुन्हा एका प्रभागात दोन आणि एका प्रभागात एक अशा तीन जागांना स्थगिती देण्यात आली आहे.
पुलगाव : पुलगाव येथे अध्यक्ष व १० प्रभागातील २१ सदस्यपदासाठी निवडणूक होत आहे. प्रभाग २ “अ’ व प्रभाग ५ “अ’ मध्ये आक्षेप नोंदविण्यात आले होते. निवडणूक निर्णय अधिकारी अनिकेत सोनावणे यांनी आक्षेप निकाली काढले. पुढे ही प्रकरणे जिल्हा सत्र न्यायालयात गेले. तेथे दोन्ही अपिल न्यायालयाने खारीज केल्या.
देवळी : देवळी येथे नगरपालिकेचा अध्यक्ष व १० प्रभागातील २० सदस्य पदासाठी निवडणूक होणार होती. येथे अध्यक्ष पदावरच आक्षेप घेण्यात आला होता. हा आक्षेप निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा क्षीरसागर यांनी निकाली काढला. त्यानंतर हे प्रकरण अपिलासाठी जिल्हा सत्र न्यायालयात गेले. न्यायालयाने अपिल खारीज केली. निवडणूक आयोगाने निर्देश कायम ठवल्याने दवळी नगरपालिकच अध्यक्ष व दहा प्रभागातील २० सदस्यपदाची म्हणजेच संपूर्ण देवळी नगरपालिकेची निवडणूकच स्थगित झाली आहे.









