युवा हिंदू समितीव्दारे निषेध मोर्चा, हिंदू बांधवांनी एकत्र येवुन भर पावसात व्यक्त केला आक्रोश
वर्धा/प्रतिनिधी वर्धा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दि. २६ सप्टेंबर रोजी वर्धा जिल्ह्यातील सव हिंद बाधवानी एकत्रित यवन संपुर्ण भारतात होणाऱ्या गणपती विसर्जन आणि गणपती विसर्जनावर झालल्या दगडफकीच्या निषेधार्थ या निषेध सभेचे आयोजन हिंदु युवा समीती द्वारे करण्यात आले होते. देशात हिंदु देव-देवतांच्या व संत महात्म्यांच्या होणाऱ्या अपमान व धार्मिक स्थळांवर हल्ले अशा होणाऱ्या घटनांचे प्रमाण वाढतच आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी सरकारने कडक कायद्याची निर्मिती करण्याकरीता संदर्भातील निवेदनही समितीने मा. जिल्हाधिकारी यांचे मार्फत मा. पंतप्रधानांना देण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते ह.भ.प. राजा महाराज शेंडे, ह.भ.प. मयुर महाराज यांची उपस्थिती होती. आयोजकांतर्फे संपुर्ण जिल्ह्यातुन जवळपास हजारोंच्या संख्येने हिंदु एकत्रित आले. सभेपुर्वी मुसळधार पाऊस सुरु झाल्यामुळे कार्यक्रमावर प्रश्न चिन्ह झाला होता. तरीही समस्त जमलेल्या हिंदु बांधवांनी ठरविल्याप्रमाणे पावसाला दुजोरा देत विजांच्या कडकडेत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन शिवगर्जनाच्या गजरात कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. ह.भ.प. राजा महाराज शेंडे यांनी हिंदु बांधवांना कठोर शब्दात प्रहार करत मार्गदर्शन केले. हिंदु देवी देवतांवर व संत महात्म्यांवर विटंबना व धार्मिक स्थळांवर होणारे हल्ले करणाऱ्या विकृत मानसिकता असलेल्यालोकांवर कडक कायदा निर्मिती करण्याची आवश्यकता असल्याची मागणी यावेळीकरण्यात आली. हिंगणघाट शहरातुन हिंदु बांधवांनी २३ गाड्यांच्या ताफ्यासह मोठ्या संख्येने हजेरी लावुन भर पावसात निषेध व्यक्त केला. युवांच्या आवाहानाला योग्य तो प्रतिसाददेत जिल्ह्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधी,पदाधिकारी युवा नागरीकांनी हजेरी लावत निषेध दर्शविला. कार्यक्रमाचे आयोजन हे हिंदु युवा समीती द्वारे करण्यात आले होते. प्रत्येक हिं०दुच्या हितार्थ कार्यरत राहणार असे आवाहन समिती द्वारे करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येनी हिंदु वर्ग सहभागी झाला होता.