भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश निमंत्रित सदस्य पदावर भाजयुमो जिल्हाध्यक्ष वरुण भाऊ पाठक यांची नियुक्ती

वर्धा/प्रतिनिधी दिनांक ३ मे रोजी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी ची घोषणा भाजपा प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रशेखर जी बावनकुळे यांनी केली. या कार्यकारीणी मधे भाजयुमो चे जिल्हा अध्यक्ष श्री वरुण पाठक यांची महाराष्ट्र प्रदेश निमंत्रीत सदस्य म्हणुन नियुक्ती करण्यात आली. वरुण पाठक यांनी मागिल काहीं वर्षात युवा मोर्चा च्या माध्यमातून आपल्या कामाचा ठसा उमटविला. मागील ठाकरे सरकार च्या काळात अनेक आंदोलने व सगळ्या भाजपाच्या कार्यक्रमात सक्रिय सहभाग होता. त्याचीच दखल घेत त्यांची प्रदेश निमंत्रीत सदस्य पदावर नियुक्ती करण्यात आली.

नियुक्ती बद्दल वरुण पाठक यांनी भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर, भाजयुमो प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, भाजयुमो प्रदेश सरचिटणीस बादल कुळकर्णी, शिवानी दाणी, माजी खासदार दत्ताजी मेघे, खासदार रामदास तडस, भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील गफाट,आमदार रामदास आंबटकर, पंकज भोयर, दादाराव केचे, समीर कुनावार, राजेश बकाने,भाजपा सरचिटणीस अविनाश देव कमल कुलधरिया, अतुल तराले, मिलिंद भेंडे यांचे आभार मानले..