मी शिवरायांच्या चरणांवर डोकं ठेवून माफी मागतो, माझे संस्कार वेगळे आहेत- पीएम मोदी

पालघर/प्रतिनिधी जिल्ह्यातील वाढवण बंदराच्याभूमिपूजनासाठी महाराष्ट्रामध्येआलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधीलराजकाट किल्ल्यावरील महाराष्ट्राचआराध्य दैवत छत्रपती शिवाजीमहाराज यांचा पुर्णाकृती पुतळाकोसळल्याने मी शिवरायांच्याचरणावर डोकं ठेवून माफी मागतो,अशा शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली. पीएम मोदी यांनी शिवभक्तांचीसूद्धा माफी मागितली. माझे संस्कारवेगळे आहेत असे म्हणत माफी मागत असल्याचे ते म्हणाले.सावरकरांचा अपमान करूनहीमाफी मागत नसलेल्यांपैकी मीनाही. माझे संस्कार वेगळे आहेत,असेही पीएम मोदी म्हणाले.शिवरायांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण मोदींच्याच हस्तेगेल्यावर्षी डिसेंबर महिन्यातकरण्यात आले होते. मात्र, हाच पुतळा कोसळल्याने राज्यात संतप्तअसून हा महाराजांचा अपमानअसल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.त्यामुळे मोदी राज्यात आल्यानेकोणती प्रतिक्रिया दणार याकडे लक्षहोते. मात्र, त्यांनी थेट माफीनामा दत वादावर पडदा टाकण्याचाप्रयत्न केला आहे.