मेघे वैद्यकीय संस्था देशात अग्रेसर, राष्ट्रीय मानांकनात पहिल्या पंचवीसमध्ये

वर्धा/प्रतिनिधी सावंगी येथील दत्ता मेघे वैद्यकीय उच्च शिक्षण संस्थेने उत्तम कामगिरी बजावत देशात पंचविसावा तर राज्यात पहिल्या तीन संस्थेत येण्याची भरारी घेतली आहे. विद्यापीठ अनुदान आयोग द्वारा मान्यताप्राप्त नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फोरम या संस्थेतर्फे हे मानांकन दरवर्षी दिल्या जाते. मेघे संस्था सर्व राष्ट्रीय शैक्षणिक संस्थेत ७५ वी, विद्यापीठ श्रेणीत ३९ वी असून या संस्थेचे दंत महाविद्यालय देशातील दंत महाविद्यालयत सतरावे आले आहे. संस्थेने संशोधन,रुग्ण सेवा, सामुदायिक सेवा, विविध वैद्यकीय उपक्रम , कारोना कालीन उपचार व अन्य विभागात अव्वल कामगिरी नोंदविल्याचे प्रशासकीय अधिकारी डॉ.उदय मेघे यांनी सांगितले.

गतवर्षी राज्यात आमची संस्था पहिल्या तीन मध्ये तर यावर्षीदुसऱ्या स्थानावर राहण्याची शक्यताअसल्याचे ते म्हणाले.विश्वस्तसागर मेघे, प्रबंध संचालक डॉ. राजीव बोरले, कुलगुरू डॉ.ललितवाघमारे,सल्लागार डॉ.मिश्रा यांचे योगदान व कुलपती दत्ता मेघेयांचे मार्गदर्शन संस्थेचा लौकिक वाढविण्यास कारण ठरल्याचे ते सांगतात. काही वर्षांपूर्वी संस्थेने सुरू केलेल्या सिद्धार्थ गुप्ताकर्करोग संशोधन व उपचार केंद्रानेया वाटचालीत महत्वाचा वाटाउचलल्याचे म्हटल्या जाते.