मविआला धक्का; २४ ऑगस्टचा बंद बेकायदेशीर असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय!

मुंबई/प्रतिनिधी राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी महाविकास आघाडीने उद्या २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र, अशाप्रकारे बंद घोषीत करणे बेकायदा असून कोणत्याही पक्षाला बंद पुकारण्याचा अधिकार नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.

उच्च न्यायालयाचा हा निर्देश महाविकासआघाडीसाठी मोठा धक्का आहे. यावरून आता पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या या बंद विरोधात आज वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज तातडीची सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने अशाप्रकार बद घोषीत करता येणार नाही, असे स्पष्ट केले. तसेच बंद घोषीत करणे बेकायदा असूनजर उद्या कुणी अशाप्रकारे बंद पुकारतील त्यांच्यावर कारवाई करा, असे निर्देशही न्यायालयाने दिले.