आयेगा तो मोदी ही, पण भाजपा किती जागा जिंकणार?- राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर

 नवी दिल्ली/प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या पाच टप्प्यातील एकूण ४२८ जागांवर मतदान पूर्ण झालं आहे. आता केवळ दोनटप्प्यातील मतदान बाकी आहे. अशातच आता ४ जूनरोजी काय होणार? याबाबत राजकीय वतर्ुळात विविध चर्चा रंगू लागल्याआहेत. भाजपाला ४०० जागा मिळणार की इंडिया आघाडीचे सरकार येणार असे एक ना अनेक मुद्दे या चर्चांच्या केंद्रस्थानीआहेत. दरम्यान, याबाबत आता निवडणूकरणनीतीकार प्रशांत किशोर यांनी भाष्य केलं आहे.

प्रशांत किशोर यांनी नुकताचएनडीटीव्हीला मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यादरम्यान, त्यांना ४ जून रोजीच्या निकालाबाबतही विचारण्यातआलं. याबाबत बोलताना, ४ जून रोजी नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान बनतील, असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. तसेच २०१९ प्रमाण भाजपाला ३०० किंवा त्यापेक्षा थोड्या जास्त जागा मिळतील असं भाकीतही त्यांनी वर्तवलं. प्रशांत किशोर म्हणाले, पूर्व आणि दक्षिण भारतात भाजपाच्या जागा आणि मतांची टक्केवारी दोन्ही वाढताना दिसून येत आहे. दक्षिण पूर्व भागात भाजपाच्या १५ -२० जागा वाढण्याची शक्यता आहे. शिवाय उत्तर पश्चिम भागातही भाजपाच फार काही नकसान हाइल, अस वाटत नाही.