बुद्धिबळपटू तनिषा बोरामणिकरने बारावीत मिळवले १०० टक्के; पुढचे टार्गेट सीए, त्यानंतर युपीएससी

छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी बारावी बोर्डाचा आज ऑनलाइन निकाल जाहीर झाला आहे. यात शहरातील तनिषा बोरामणीकर हिने वाणिज्य शाखेत १०० टक्के गुण मिळवत जबरदस्त कामगिरी केली आहे. तनिषा ही नामवंत बुद्धिबळपटू असून स्पोर्टच्या अतिरिक्त गुणांचा देखील तिच्या यशात समावेश आहे. वाणिज्य शाखेतून राज्यात सर्वप्रथम आल्याने तनिषाचे कौतुक होत आहे. तनिषा रेणुका सागर बोरामणीकर ही बुध्दिबळ पटू आहे. तिला दहावीत ९८ टक्के गुण होते. त्यानंतर देवगिरी महाविद्यालयात बारावी वाणिज्य शाखेत तिने प्रवेश घेतला.

बारावीच्या अभ्यासासोबतच तनिषाचा देशभर बुध्दीबळ स्पर्धांत सहभाग हाता. बारावीत दखील ९५ टक्केच्या पुढे गुण मिळतील अशी आशा तिने बाळगली होती. आज निकाल लागल्यानंतर वाणिज्यशाखेत ६०० पैकी ६०० गुणमिळवत तनिषाने इतिहास रचला. विशेष म्हणजे, तिन्ही शाखेत मिळून१०० टक्के गुण मिळवणारी तनिषा एकमेव ठरली आहे. तनिषा नामवंतबुध्दिबळ खेळाडू असून तिने देश पातळीवरील बुध्दिबळाच्या अनेकस्पर्धांमध्य यश मिळवल आह.यामुळे स्पोर्ट्सच्या अतिरिक्त गुणांचातिला लाभ झाला.