सावंगी मेघे रुग्णालयातील जीवनदायी उपचार ब्रेन स्ट्रोकमुळे मूर्च्छित रुग्णाला लाभले नवजीवन

वर्धा/प्रतिनिधी पूर्वी दोनदा ब्रेनचा अटॅक आला असताना आणि अन्य गंभीर आजार असताना पुन्हा ब्रेन स्ट्रोकमुळे बेशुद्धावस्थेत गेलेल्या मध्यमवयीन रुग्णाला व्हेंटिलेटरच्या सहाय्याने मरणासन्न अवस्थेतून बाहेर काढत नवे जीवन देणारी उपचार प्रक्रिया सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या मेडिसिन विभागात यशस्वीरित्या पूर्णत्वास नेण्यात आली. सविस्तर वृत्त असे की, स्थानिक रहिवासी अब्दुल रशीद अब्दुल अजीज शेख (५० वर्षे) या रुग्णाला दीर्घकालीन मूत्रपिंडाचा आजार, त्यात उच्च रक्तदाब आणि वाढलेला मधुमेह या कारणांनी पूर्वीच दोनदा ब्रेन अटॅक येऊन गेलेला होता. गंभीर आजारांचा पूर्वइतिहास असताना पुन्हा एकदा ब्रेन स्ट्रोकमुळे रुग्ण बेशुद्धावस्थेत गेला. नातेवाईकांनी मूर्च्छितावस्थेतच रुग्णाला तातडीने सावंगी मेघे रुग्णालयात आणले. मेडिसिन विभागातील तज्ज्ञ डॉ. सौर्य आचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णाला अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले. रुग्णाची तपासणी व विविध चाचण्या केल्या असता मधुमेह आणि रक्तदाब अनियंत्रित झाल्याचे दिसून आले. त्यातच रक्तात जंतूसंक्रमण झाल्याने मेंदूला रक्तपुरवठा होणे बंद झाले.

मेंदूवरील हा अटॅक इतका मोठा होता की रुग्ण बेशुद्धावस्थेत गेला. तोंडातून फेस येणे सुरू झाले. अशावेळी डॉ. सौर्य आचार्य यांनी रुग्ण व्यवस्थापनासाठी सर्वतोपरी काळजी घेत व एंडोट्रॅचियल इंट्यूबेशन ही वैद्यकीय प्रक्रिया राबवित व्हेंटिलेटरच्या सहाय्याने कृत्रिम श्वसनयंत्रणा कार्यान्वित केली. सोबतच सलाईनद्वारे योग्य औषधोपचार सुरू करण्यात आला. या उपचारांना प्रतिसाद देत रुग्ण बेशुद्धावस्थेतून बाहेर पडत पूर्ववत श्वास घेऊ लागला. तब्बल १४ दिवसांनंतर कृत्रिम श्वसनप्रणालीसाठी लावलेले इंट्यूबेशन काढण्यात आले. या उपचार प्रक्रियेत डॉ. आचार्य यांच्यासह डॉ. पलाश कोटक, डॉ. सारंग राऊत, डॉ. कशिश खुराना, डॉ. अजिंक्य कडू,डॉ. तेजस नेहाटे यांचाही महत्त्वपूर्णसहभाग मिळाला. उपचार पूर्ण झाल्यावर रुग्णालादवाखान्यातून सुट्टी देण्यात आली असून रुग्ण पूर्णतः बरा आहे.शासनाच्या महात्मा ज्योतिबाफुले जनआरोग्य योजनेमुळे निः शुल्क उपचारांचा लाभ रुग्णाला मिळाला आहे. रुग्णाची अवस्था पाहून कुटुंबातील सदस्यांनीही आशासाडन दिली हाती. मात्र अद्ययावतउपचारप्रणाली व वैद्यकीय चमूच्याप्रयत्नांना यश आले आणि शुद्ध हरपलेला रुग्ण हसतमुखाने घरीपरतला यातच आनंद आहे,असे डॉ. सौर्य आचार्य यांनीसांगितले.