राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: आज १२ वीचा निकाल

राज्य बोर्डाकडून उद्या दुपारी १ वाजता १२ वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जाणार आहे. या निकालाकडे राज्यातील लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचं लक्ष लागून होतं. अखेर आज राज्य मंडळाने पत्रकार परिषद घेऊन निकालाची तारीख जाहीर केली आहे. ऑनलाइन पद्धतीने हा निकाल जाहीर होणार असून निकाल जाहीर झाल्यानंतर ५ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करण्याची असल्यास अर्ज करता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. “सीबीएसई’ परीक्षांचा निकालजाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रातील बारावीच्या निकालाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर राज्य मंडळाच्या सचिवा अनुराधाओक यांनी बारावीच्या निकालाबाबतचे सोमवारी पत्र प्रसिद्ध केलं आहे. त्यानुसार मंगळवार २१ म २०२४ राजी दपारी १ वाजता आनलाइन निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचेम्हटले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांत परीक्षा घेण्यात आली होती. बारावीच्या परीक्षेसाठी सोलापूर जिल्ह्यातील ११८ केंद्रांवर ५२ हजार ८७० विद्यार्थ्यांनी, तर दहावीच्या ६५ हजार ७४९ विद्यार्थ्यांनी १८२ केंद्रांवरून परीक्षा दिली. परीक्षा कालावधीत कॉफीचा प्रकार रोखण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. बारावीच्या परीक्षेला बुधवार, २१ फेब्रुवारीपासून सुरूवात झाली होती.