दिंडोरा बॅरेज प्रकल्पग्रस्तांचे नदीत ठिय्या आंदोलन

हिंगणघाट/प्रतिनिधी तालुुक्यातील दिंडोरा बॅरेजप्रकल्पग्रस्तांनी आपल्या प्रलंबीत विविध मागण्यांसाठी शेकापूर येथीलनदीत सरकारच्या विरोधात निदर्शनेकरीत ठिय्या आंदोलन केले. दिंडोरा बॅरेज प्रकल्प संघषसमितीच्या वतीने मंगळवार ६रोजी करण्यात आलेल्या याआंदोलनातून प्रकल्पग्रस्तांच्याप्रलंबित मागण्यासंदर्भात प्रशासनाचेलक्ष वेधले. मागील अनेकवर्षांपासून समितीच्या वतीनेविविध आंदोलने करूनप्रकल्पग्रस्तांच्या न्यायासाठी लढा देत आहे. दरम्यान, मंगळवारीशेकापूरच्या नदी परिसरातप्रकल्पग्रस्तांना जमिनीचा मोबदलादेण्यात यावा, कुटुंबातील एकाव्यक्तीला शासकीय नोकरी आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. निवेदन देण्यासाठीसमितीच्या वतीने हिंगणघाट क्षेत्राच्या अभियंत्यांना बोलावण्यात आले होते.

मात्र, आंदोलनस्थळी एकाही अधिकार्याने हजेरी न लावल्याने प्रकल्पग्रस्त शेतकरी व समितीच्या वतीने नदीत ठिय्या मांडून निषेध नोंदविला. या आंदोलनात पुंडलिक तिजारे, अभिजित मांडेकर, चंपत गौतम कांबळे, कैलास ठाकरे, जयंत लडके, राजू भोयर, मनोज कोसुरकर, विठ्ठल जुनघरे, मिथुन ठाकरे, अनिल मिसाळ, विद्या तिजारे, रेखा मांडेकर, मंजुषा लडके, माया भोयर, दुर्गा ठाकरे, वैशाली फुटाणे, नलू ताजणे, प्रकल्पग्रस्त शेतकरी, शेतमजूर, मच्छीमार आदींसह दिंदोडा बॅरेज साळवे, विलास भोंगाडे, प्रभू प्रकल्प संघर्ष समितीचे पदाधिकारी राजगडकर, किशोर खांडेकर, सहभागी झाले होते.