अपघात टाळण्यासाठी उपायोजना पोलीस विभाग व इतर संबंधित विभाग यांची संयुक्त बैठक
खराब रस्ते ही लवकर दुरुस्ती करावे, योग्य त्या ठिकाणी अंतरा अंतरावर वेगमर्यादेचे बोर्ड लावावे अशा महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. मोटर वाहन कायद्यान्वये संयुक्त मोहीम राबवून केसेस करण्याबाबतही सूचना देण्यात आले . अपघात होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी, शाळेतील विद्यार्थी तरुण मुले यांच्या मध्ये ही जणजागृती करावी, रोडवर जेथे अपघात प्रवन स्थळ आहेत तेथे तसे सूचना फलक बांधकाम विभाग यांनी लावावे, गाव, शाळा, चौरस्ता असेल तेथे स्पीड ब्रेकर योग्य ठिकाणी टाकावेत, अपघातात जखमी व्यक्तींर्ना लवकर प्रथमपचाराची मदत मिळावी याकरिता सर्वांनी पुढाकार घ्यावे ज्या स्वयंसेवी संघटना जखमी व्यक्तीस दवाखाण्यात पोहचवतील त्याना शासनान याग्य बक्षीस सद्धा जाहीर केलेले आहे
त्याचीही जणजागृती सर्वांनी करावे, वर्धा जिल्ह्यात अपघात कमी होणेस सर्व समंबंधित विभाग यांचे आपसात चांगले सुसंवाद असावा याबाबत सखोल चर्चा ही करण्यात आली आजची मिटिंग पोलीस अधीक्षक कार्यालयात ११/०० वाजता सुरु होऊन १२/३० वा सम्पली मा अपर पोलीस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे सर यांनी सर्व सहभागी विभाग प्रमुख यांचे ही आभार व्यक्त केले.









