वर्धा जिल्ह्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षात मोठा राजकीय बदल अतुलभाऊ वांदिले यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती !

प्रणय बालपांडे/दै.जन-संग्राम हिंगणघाट : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) ने वर्धा जिल्ह्यात संघटनात्मक बदल करत मा. अतुलभाऊ वांदिले यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या आदेशाने, प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांतजी शिंदे याच्या हस्त, तसच माजी मत्री अनिल देशमुख व आ. रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. या निर्णयाने वर्धा जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना नवा वेग मिळाल्याचे बोलले जात आहे.

जनतेशी थेट नाळ जोडणारे आणि संघर्षशील कार्यकर्ता म्हणून ओळखले जाणार अतलभाऊ वादिले यांच्याकड पक्षाने आता मोठी जबाबदारी सोपवली आहे. पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांनी यास संघटन मजबूत करणारा धाडसी निर्णय म्हटलं असून, वर्धा जिल्ह्यात नव्या नेतृत्वाची दिशा आणि धार निर्माण होणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. जनतेकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू असताना, अतुलभाऊंनी प्रतिक्रिया देताना सांगितले, पक्षाने दाखवलेला विश्वास अबाधित ठेवीन, वर्धा जिल्ह्यात पक्ष संघटन अधिक सक्षम करून प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देईन!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *