वर्धा जिल्हा ओला दुष्काळग्रस्त घोषित करा : आप ची मुख्यमंत्र्यांना मागणी

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : आम आदमी पार्टी वर्धा जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वर्धा जिल्हा ओला दुष्काळ ग्रस्त घोषित करावा आणि शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाइ तत्काळ आथिक स्वरूपात दण्यात यावी अशी मागणी वर्धा जिल्हाधिकारी अनुपस्थित असल्यामुळे निवासी उप जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदनातून करण्यात आली. या वेळी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांना सुधा निवेदनाची सहप्रत देऊन मागणी करण्यात आली. वर्धा जिल्ह्यात सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात पिकांची नासाडी झाली असुन, अनेक ठिकाणी शेत जमिनी खरडून निघाल्या आहे, सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात येलो मोजॅक (पांढरी माशी) विषाणू मुळे उभी पीक करपली आहे.

आज घडीला प्रशासनाच्या वतीने नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून पंचनामे करण्याची लांब लचक अपारदर्शक प्रक्रिया सुरू आहे. पण नुकसान भरपाई केवळ पंचनाम्यावर आधारित न देता सरसकट व तातडीने आर्थिक स्वरूपात नुकसान भरपाई देण्यात यावी. बहुदा पंचनाम्यातील त्रुटीमुळे अनेक शेतकरी भरपाईपासून वंचित राहतात.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अती संवेदनशील परिस्थिती ओढवली आहे, याची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ .पंकज भोयर यांनी तात्काळ दखल घेऊन वर्धा जिल्ह्याला ओला दुष्काळ ग्रस्त घोषित करावे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत तात्काळ द्यावी अशी मागणी करण्यात आली. वरील मागण्याची पूर्तता ताबडतोब करण्यात यावी, अन्यथा आम आदमी पार्टीच्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून श्रीकांत दोड यांनी दिला. निवदन सादर करताना जिल्हा अध्यक्ष श्रीकांत दोड, जिल्हा सचिव संजय आचार्य, जिल्हा संघटन मंत्री सुर्या सोनोने, शहराध्यक्ष कुणाल लोणारे, जिल्हा सह सचिव सुनील शामडीवाल, सिद्धांत राऊत प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *