जास्तीत जास्त नागरिकांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा; जिल्हाधिकारी वान्मथी सी यांच्या सूचना
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता नरेंद्र मोदी यांचा जन्म दिन १७ सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक २ ऑक्टोंबर या कालावधीमध्ये महसूल पंधरवाडा राबविण्यात येणार आहे. महसूल पंधरवाडात नागरिकांकडून प्राप्त होणा-या अर्जावर तात्काळ कार्यवाही करुन प्रकरणे निकाली काढावी. यासाठी लावण्यात येणा-या स्टॉलवर ऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध करुन देण्यासोबतच स्टॉलवर जबाबदार अधिका-यांची नियुक्ती करावी. सर्व संबंधित विभागांनी राबविण्यात येणा-या योजनांचा लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी योजनांची यादी व मान्यवरांचे हस्ते प्रत्यक्ष लाभ देण्या-या लाभार्थ्यांची यादी तात्काळ सादर करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी दिल्यात. पंधरवाड्यादरम्यान अतिक्रमण नियमानुकुल करणे, जमीन मालकांना पट्टे वाटप करणे, पांदन रस्ते मोकळे करणे या कामास प्राधान्य दिले जाणार असून राज्य शासनामार्फत राबविण्यात येणा-याफ्लॅगशिप योजनांचा सुध्दा पंधरवाड्यातसमावेश करण्यात यावा.
महसूल मंडळस्तरावरउपविभागीय अधिकारी यांच्या उपस्थितमहसूल पंधरवाड्याचे तसेच तालुकास्तरावरआयोजित महसूल पंधरवाडामध्ये महसूल, कृषि, ग्रामविकास अशा महत्वाच्याविभागातील योजनांचा समावेश करुनलाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा अशा सूचनाजिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी दिल्या. महसूल पंधरवाडा कालावधीत महसूल,कृषि विभाग, पुरवठा विभाग, वन विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, आदिवासीविकास विभाग, उपनिबंधक सहकारी संस्था,नगर पालिका, ग्राम विकास विभाग, मत्स्य विभाग, रेशीम विभाग, परिवहन विभाग, विद्युत वितरण वितरण कंपनी आदीविभागामार्फत राबविण्यात येणा-या योजनांचालाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यातआले.









