आपल्या संविधानाचा अभिमान; सरन्यायाधीश भूषण गवई यांचं नेपाळच्या परिस्थितीवर भाष्य

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम नवी दिल्ली : नेपाळमध्ये सध्या मोठ्या घडामाडी सरू आहेत. “जेन-झी’ने सरकारविरोधात सोमवारी सुरू केलेल्या निदर्शनांनी मोठ्या प्रमाणात उग्र स्वरूप धारण केलं आणि अखेर पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांना राजीनामा द्यावा लागला. निदर्शकांचा संताप एवढा होता की त्यांनी पार्लमेंटसह अनेक महत्त्वाच्या इमारतींची जाळपोळ केली.

नेपाळची संसद, सर्वोच्च न्यायालय आणि इतर महत्त्वाच्या इमारतींची जाळपोळ करण्यात आली. शर्मा यांच्या राजीनाम्यानंतर नेपाळमधील परिस्थिती पूर्व पदावर आणण्यासाठी लष्कराकडून प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, नेपाळमधील परिस्थितीवर जगभरातून प्रतिक्रिया येत आहेत. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी देखील प्रतिक्रिया देत नेपाळ आणि बांगलादेशमधील परिस्थितीवर भाष्य केलं आहे.”आपल्याला आपल्या देशाच्यासंविधानाचा अभिमान आहे’, असं म्हणत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नेपाळमधील हिंसाचाराच्या घटनांवर टिप्पणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *