मुंबई-ठाणे नवीन मेट्रो, लोकल ट्रेन खरेदी, पुणे-लोणावळा चौपदरीकरण मंजूर

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई: एकीकडे मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरून राजकीय वतर्ुळात घडामोडींना वेग आला असताना राज्याच्या मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक झाली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सामाजिक न्याय, ऊर्जा, कामगार, आदिवासी विकास, नगरविकास आणि विधि व न्याय विभागाशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या जीआरवरून ओबीसी नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित राहिल्याचे म्हटले जात आहे. सामाजिक न्याय विभागाच्या निणयानसार संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेंतर्गत दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात १ हजार रुपयांची वाढ करण्यात आली असन लाभाथ्याना दरमहा अडीच हजार रुपये मिळणार आहेत. तसेच मुंबई ठाणे नव्या मेट्रो मार्गिकेला मान्यता, मुंबई लोकल खरेदी, पुणे लोणावळा तिसऱ्या चौथ्या मार्गिकेच्या प्रकल्प खर्चाची तरतूद असे अनेक निर्णय घेण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *