हाडपक्या गणपती उत्सवाला आजपासून भव्य सुरुवात भोसले घराण्याची २३८ वर्षांची परंपरा आजही तेवतीच तेजस्वी!
या परपरमाग एक ऐतिहासिक कथा आहे. नागपूरचे राजे चिमाजी भोसले बंगाल मोहिमेवर गेले असता, गणेशोत्सव संपून गेला होता. मात्र, विजयप्राप्तीनंतर नवस फेडण्यासाठी पितपक्षात गणपतीची स्थापना करण्यात आली, आणि त्या क्षणापासून या आगळ्या-वेगळ्या गणपती उत्सवाला सुरुवात झाली. या उत्सवातील गणपती बाप्पाला नवसाला पावणारा मानले जाते, म्हणूनच विदर्भभरातून भाविक या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येतात.
या उत्सवात पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम, भक्तिगीते, लोककला, आणि विविध धार्मिक विधी पार पाडले जातात. नागपूरपासून सुरू झालेली ही परंपरा आज संपूर्ण विदर्भात पसरली आहे, आणि विदर्भाच्या संस्कृतीचा अभिमानास्पद भाग बनली आह. भासले घराण्याच्या या परंपरेने केवळ धार्मिकतेच नाही, तर इतिहास, परंपरा आणि सांस्कृतिक वारसा यांचं संगम साधलं आहे. आजच्या पिढीसाठीही हा उत्सव श्रद्धा, परंपरा आणि एकत्रिततेचं प्रतीक आहे.









