लोकसभेत बाहेरचा उमेदवार नकोच

वर्धा/प्रतिनिधी आगामी सर्वच निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार आहेत. महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्यामुळे काँग्रेस या मतदार संघावरून हक्क सोडणार नाहीच. तरीही आघाडीतील कोणत्याही पक्षाकडे वर्धा लोकसभा मतदार संघ गेल्यास बाहेरचा उमेदवार आम्हाला नको. वर्धा जिल्ह्यात सक्षम नेतृत्व असल्याची माहिती राकाँचे नेते माजी आ. सुरेश देशमुख यांनी दिली. स्थानिक विश्रामगृह येथे २८ रोजी आयोजित पत्रकार परिषदेत देशमुख बोलत होते.

यावेळी राकाँचे ज्येष्ठ नेते व हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड. सुधीर कोठारी, काँग्रेसचे नेते शेखर शेंडे, राजेंद्र शर्मा, इक्राम हुसैन, प्रमोद हिवाळे, अनिल देवतारे आदींची उपस्थिती होती.

देशमुख पुढे म्हणाले की, राकाँत कोणतेही वाद नाहीत. महाविकास आघाडी एकत्र लढणार आहेत. त्यात वर्धा लोकसभा मतदार संघात कोणत्याही पक्षाला तिकीट दिली तरी आम्ही एकत्र काम करू. मात्र, उमेदवार बाहेरचा नसावा असे त्यांनी सांगितले. शेखर शेंडे यांनी पक्षाचा निर्णय आम्हाला मान्य राहिल. परंतु, उमेदवार बाहेरचा नको यावर आमचे एकमत झालेले असल्याचे त्यांनी सांगितले.

आमच्या या मोहिमेला ॲड. चारूलता टोकस यांनीही पाठींबा दिला असल्याचे शेंडे यांनी सांगितले तर ॲड. कोठारी यांनी आम्ही बाहेरच्या उमेदवारांना भीतो असे नाही. आम्ही सक्षम आहोत. परंतु, महाविकास आघाडीच्याजास्तीत जास्त जागा निवडून येण्यासाठी वर्धा लोकसभा मतदार संघात स्थानिकउमेदवाराला प्राधान्य दिले पाहिजे, यावर आम्ही ठाम असल्याचे ॲड. कोठारी यांनी सांगितले तर राजेंद्र शर्मा यांनी वर्धेत स्थानिकउमेदवार या विषयावर स्थानिक महाविकासआघाडीचे एकमत झाले आहे.

आम्ही या संदर्भात आ. रणजित कांबळे यांच्यासोबतहीभेटणार असल्याचे त्यांनी सांगितले. आम्हीविरोध म्हणून काम करीत नाही. त्याहीनंतर पक्षश्रेष्ठींनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य राहिल, असे सांगितले तर शिवसेनेचे देवतारेयांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काविचारासोबत आपण सहमत असल्याचेसांगितले.