बुधवार आणि गुरुवारी विदर्भाला ऑरेंज अलर्ट
पुढील दोन दिवस विदर्भात आकाशात ढग दाटलेली असतील. मात्र, बुधवारी आणि गुरुवारी विदर्भातील काही जिल्हात मुसळधार पाऊसाची दाट शक्यता असल्यामुळे हवामान विभागाकडून “ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने गडचिरोली, यवतमाळ, भंडारा, गोंदिया जिल्ह्याचा समावेश आहे. “मे’ महिन्यात नागपूर आणि विदर्भात उचांक्की तापमानाची नोंद असते. यावेळी तो मार्च, एप्रिल महिन्यातच नोंदवला गेला. तापमान जवळजवळ ४६ अंश सेल्सिअसपर्यंत गेले होते. मात्र, यंदा हवामानात कमालीचा बदल झालेला दिसतोय. गेल्या पाच दिवसापासून संपूर्ण विदर्भात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे तापमानात देखील घट नोंदवण्यात आली आहे.
विदर्भातील जिल्ह्याचे तापमान सामान्यपेक्षा तीन ते पाच अंश सेल्सिअसने खाली आले आहे. एरवी मे महिन्यात विदर्भात सरासरी तापमान हे ४५ ते ४७ डिगीपयत जात. मात्र, वातावरणात बदल झाल्यामुळे तापमानाचा पारा सामान्य तापमानापेक्षा खाली आलेला आहे. उष्ण वाऱ्याची दिशा बदललेली आहे आणि वाऱ्याचा वेग देखील वाढला आहे. त्यामुले मसळधार पावसासाठी पोषक असे वातावरण तयार झाले आहे. गेल्या पाच दिवसापासून असलेले ढगाळ वातावरण पुढील आठवडाभर कायम राहणार आहे, असे नागपूर येथील प्रादेशिक हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे ऊन आणि उकड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.