पीएम जनमन, धरती आबा सारख्या योजनांमधून प्रत्येक आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी पीएम जनमन, धरती आबा सारख्या अनेक योजना नव्याने सुरु केल्या. राज्यात या योजनांच्या माध्यमातून प्रत्येक आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. वर्धा येथे नव्याने लोकार्पण झालेली प्रकल्प कार्यालयाची ईमारत यासाठी महत्वाचे योगदान देईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. येथील ईव्हेंट सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सेवा पंधरवड्याचा समारोप तसेच उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय ईमारतींचे लोकार्पण झाले. त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमास आदिवासी विकास मत्री प्रा.डा.अशाक उईक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, पालकमंत्री डॅा.पंकज भोयर, आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आ.दादाराव कचे, आ.समिर कुणावार, आ.सुमित वानखेडे, आ.राजेश बकाने, माजी खासदार रामदास तडस, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार, जिल्हाधिकारी वान्मथी सी, अप्पर आदिवासी आयुक्त आयुषी सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सरिता गाखरे आदी उपस्थित होते. मी मुख्यमंत्री असतांना वर्धा येथे पंकज भोयर यांच्या सातत्याच्यापाठपुराव्याने प्रकल्प कार्यालय मंजूर केले होते. या कार्यालयाचे लोकार्पण देखील माझ्याहस्ते होत आहे. आदिवासी समाज पुढे गेला पाहिजे, यासाठी प्रधानमंत्र्यांच्यादुरदृष्टीने सातत्याने काम केलेजात आहे. देशाच्या ईतिहासातपहिल्यांदाच दौपदी मुमर्ू यांच्या रुपानेआदिवासी महिला देशाच्या सर्वो च्च राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्या आणि देशात एका नवीन पर्वाला सुरुवात झाली.

राज्यात २०१४ मध्ये आमचे सरकार आल्यानंतर पहिल्याचकॅबिनेट बैठकीमध्ये आम्ही सेवा हमीकायद्या करण्याचा निर्णय घेतला. आज सेवा ही हमी झाली आहे. प्रत्येकाला सेवा मिळविण्याचा हक्कप्राप्त झाला. वेळेत सेवा न दिल्यासदंडाची तरतूद देखील करण्यातआली आहे. आ.समिर कुणावार यांनी त्यावेळी आपल्या मतदारसंघातमोठ्या संख्यन समाधान शिबिरघेतले. एकाच मतदारसंघात ५०हजारावर नागरिकांना लाभ त्यांनी दिला. त्यांची ही कल्पना आम्ही राज्यभर राबविली. मधल्या काळातशासन आपल्या दारी हे उपक्रमराज्यभर राबविले. सर्वसामान्यनागरिकांना दिलासा मिळालापाहिजे, हीच या मागची भावना, असल्याचे मुख्यमंत्री श्री.फडणवीसम्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *