वादळ आलं तरी, १०० वर्षे कुठल्याही वातावरणात हा पुतळा टिकेल; मुख्यमंत्र्यांची माहिती, सिंधुदुर्गात नवा पुतळा
मालवण किल्ल्यावर दुर्दैवी घटना झाल्यानंतर विक्रमी वेळेत पुन्हा हा पुतळा प्रस्थापित करू शकलो. मी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभिनंदन करतो. शिवेंद्रराजे भोसले आणि रविंद्र चव्हाण यांचा काळात काम वेगाने झालं. सुतार साहेबांनी उत्तम पुतळा तयार केलाय. जर वादळं आली, त्या इन्टेन्सिटीचा अभ्यास करत हा पतळा उभा करण्यात आला आह. किमान १०० वर्षे कुठल्याही वातावरणात हा पुतळा टिकेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुतळा अनावरण सोहळ्यानंतर बोलताना दिली. आयआयटीचे अभियंते आणि जे.जे महाविद्यालयीतल शिल्पकार हे पुतळा घडवताना सोबत होते. त्यामुळेच, जरी वादळ आली, तरी त्या इन्टन्सिटीचा अभ्यास करत पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे. जवळपास ९३ फुट ऊंच हा पुतळा असून १० फुटाचा चबुतरादेखील आहे. विशेष म्हणजे देशातलासर्वात उंच पुतळा देखील हा आहे.किमान १०० वर्षे कुठल्याही वातावरणात पुतळा टिकेल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पुतळ्याच्या मेन्टेनन्सची जबाबदारी पुढील १० वर्षांसाठी कंत्राटदारयांच्याकडच असेल. आम्ही निर्धार केला होता कुठल्याही परिस्थितीत महाराजांना साजेसा पुतळा उभारू तो पूर्ण झालाय, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.