आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही; मोदींचा पाकिस्तानला सज्ज्ाड दम
भारतीय सैन्याने पाकिस्तानीसैन्याला हे देखील दाखवून दिलं की पाकिस्तानमध्ये अशी कोणतीहीजागा शिल्लक नाही जिथे दहशतवादीआरामात श्वास घेऊ शकतील.आम्ही घरात घुसून मारू आणि तुम्हाला पळून जाण्याची एकहीसंधी देणार नाही असं पंतप्रधानांनीम्हटलं आहे. भारताच्या आधुनिक लष्करी क्षमतेचं कौतुक करून मोदींनीपाकिस्तानला थेट इशारा दिला. आपले ड्रोन, आपली क्षेपणास्त्र …त्यांच्याबद्दल फक्त विचार केल्यानेपाकिस्तानची अनेक दिवसांची झोपउडून जाईल. भारत ही बुद्धांची भूमी आहे आणि गुरू गोविंदसिंहजी यांचीही भूमी आहे. गुरू गोविंद सिंहजी यांनी म्हटलं होतं की, ‘सवा लाख से एक ल़डाऊं, चिि़डयन ते मैं बाज तु़डाऊं, तबै गुरु गोबिंद सिंह नाम कहाऊं’ वाईटाचा नाश करण्यासाठी आणि आपल्या धर्माच्या रक्षणासाठी शस्त्र उचलणं ही आपली परंपरा आहे.
म्हणूनच जव्हा आमच्या बहिणी आणि मुलींचं सिंदूर हिसकावून घेतलं गेलं, तव्हा आम्ही दहशतवाद्याच्या घरात घुसून त्यांना चोख उत्तर दिलं. ते भित्र्यासारखे लपून आले, पण ते विसरले की, त्यांनी ज्याला आव्हान दिलं होतं ते भारतीय सैन्य होतं. समोरून हल्ला करून तुम्ही त्यांना मारलं आहे. दहशतवादाचे सर्व प्रमुख अड्डे उद्ध्वस्त केले. दहशतवाद्यांचे ९ अड्डे उद्ध्वस्त झाले, १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. दहशतवादाच्या सूत्रधारांना आता हे समजलं आहे की भारताकडे नजर वर करून पाहिल्यास एकच परिणाम होईल तो म्हणजे विनाश असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.