आरोग्यसेवेचा आदर्श अधिक वृद्धिंगत करा- डॉ. आरती सरीन

या समारोहाला अदानी फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. प्रीती अदानी यांची विशेष उपस्थिती होती. समारोहात विद्यापीठाचे कुलपती दत्ता मेघे यांनी स्नातकव स्नातकोत्तर विद्यार्थ्यांना आरोग्यसेवेची दीक्षा दिली. सावंगी मेघे येथील विद्यापीठ सभागृहातआयोजित या समारोहात प्रारंभी डॉ. प्रीती अदानी, दत्ता मेघे अभिमत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजीव बोरले आणि नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अभय दातारकर यांना डॉक्टरऑफ सायन्स या मानद पदवीने सन्मानित करण्यात आले. उत्कृष्टता, सचोटी आणि सेवाभाव या मूल्यांचे जतन करीत राष्ट्रीय विकास आणि जागतिक कल्याणात योगदान देण्यासोबतच भारतीय सेनेत सामील होण्याचे आवाहनही यावळी डा. आरती सरीन यांनी केले.